नेहरु मेमोरियल संग्रहालयाचे नाव आता पंतप्रधान संग्रहालय | पुढारी

नेहरु मेमोरियल संग्रहालयाचे नाव आता पंतप्रधान संग्रहालय

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा राजधानी दिल्लीतील नेहरु संग्रहालयाचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे संग्रहालय आता पंतप्रधान संग्रहालयाच्या (पीएम म्युझियम) नावाने ओळखले जाईल. संग्रहालयात सर्व १४ माजी पंतप्रधानांच्या आठवणींचा संग्रह करण्यात येणार आहे. येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान या संग्रहालयाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नेहरु मेमोरियल संग्रहालय तसेच वाचनालयात (एनएमएमएल) देशाची स्वातंत्र चळवळ तसेच इतिहासाला संरक्षित ठेवण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना १९६४ मध्ये किशोर मूर्ती हाऊस परिसरात करण्यात आली होती. आता या संग्रहालयात देशाच्या सर्व १४ माजी पंतप्रधानांच्या आठवणींचा संग्रह या करण्यात येणार आहे. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदान स्वीकार करण्यासाठी एनडीए सरकारने हे पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान संग्रहालयामध्ये सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याला संग्रहित ठेवले जाईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बीआर आंबेडकर संग्रहालयाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. भाजपच्या सर्व खासदारांनी या संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन देखील पंतप्रधानांनी मंगळवारी केले.

हेही वाचलं का ?

Back to top button