अमेरिकेतील कॉर्पोरेट कंपन्यांत भारतीयांचा दबदबा; राज सुब्रमण्यम बनले FedEx चे सीईओ | पुढारी

अमेरिकेतील कॉर्पोरेट कंपन्यांत भारतीयांचा दबदबा; राज सुब्रमण्यम बनले FedEx चे सीईओ

पुढारी ऑनलाईन डेस्क

फेडेक्स (FedEx) कंपनीने इंडियन-अमेरिकन असलेल्या राज सुब्रमण्यम (Raj Subramaniam) यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. फेडेक्स ही जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक आहे. फेडेक्स कंपनीचे सध्याचे सीईओ फ्रेडरिक डब्ल्यू स्मिथ १ जून रोजी पदावरुन पायउतार होणार आहे. त्यानंतर त्यांची जागा राज सुब्रमण्यम घेतील. स्मिथ १ जून पासून कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार आहेत. “आम्हाला आशा आहे की राज सुब्रमण्यम हे FedEx ला भविष्यात उंचीवर नेतील,” असे स्मिथ यांनी सुब्रमण्यम यांच्याबद्दल म्हटले आहे.

फेडेक्स (FedEx) ही अमेरिकेतील कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात १९७१ मध्ये झाली होती. फ्रेडरिक डब्ल्यू स्मिथ हे फेडेक्सचे संस्थापक आहेत. अमेरिकेतील टेनेसी राज्यात या कंपनीचे मुख्यालय आहे. या कंपनीत जगभरात ६ लाख कर्मचारी काम करतात.

३० हून अधिक वर्षाचा अनुभव असलेले, सुब्रमण्यम यांची २०२० मध्ये FedEx च्या संचालक मंडळावर निवड झाली होती. सुब्रमण्यम यांनी फेडक्स कॉर्पचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मार्केटिंग अँड कम्युनिकेशनचे चीफ म्हणून काम पाहिले आहे. सुब्रमण्यम मुळचे केरळमधील तिरुवनंतपूरम येथील आहेत. त्यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमधून बीटेक शिक्षण घेतले. त्यानंतर १९८९ मध्ये सिराक्यूज विद्यापीठातून (Syracuse University) केमिकल इंजिनिअरींगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button