उत्तराखंड मुख्यमंत्रीपदासाठी धामी, सतपाल महाराज, डॉ. धनसिंह रावत यांची नावे आघाडीवर | पुढारी

उत्तराखंड मुख्यमंत्रीपदासाठी धामी, सतपाल महाराज, डॉ. धनसिंह रावत यांची नावे आघाडीवर

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा :  उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले असले तरी पक्षाला अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

धामींसह प्रदेशाध्‍यक्ष काैशिक यांनी घेतली अमित शहांची भेट

कार्यवाहक मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्यासह सतपाल महाराज, डॉ. धनसिंह रावत, ऋतु खंडूडी आदी नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशावरून धामी तसेच प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. बैठकीस माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, संघटन सचिव बी. एल. संतोष हेही उपस्थित होते. तत्पूर्वी रावत यांनी स्वतंत्रपणे नड्डा व संतोष यांची भेट घेतली होती.

रेखा आर्य यांचाही धामी यांच्‍या नावाला पाठिंबा

पुष्करसिंग धामी यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र असे असले तरी मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव सर्वात पुढे आहे. अन्य प्रमुख नावांमध्ये ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, डॉ. धनसिंह रावत आणि ऋतु खंडूड़ी यांच्या नावांचा समावेश आहे. स्वतःला मुख्यमंत्री पदाचे दावेदार सांगणाऱ्या आमदार रेखा आर्य यांनी आता धामी यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे धामी यांच्यासाठी आतापर्यंत सहा आमदारांनी आपली जागा सोडण्याची घोषणा केलेली आहे.

हेही वाचा

Back to top button