काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ? व्हायरल व्हिडिओने चर्चेला उधाण, चाहत्यांची कमेंटमध्ये मारामारी (video)

काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ? व्हायरल व्हिडिओने चर्चेला उधाण, चाहत्यांची कमेंटमध्ये मारामारी (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॅालीवूड अभिनेत्री काजोल कोणत्या ना कोणत्या तरी विषयाने ती नेहमी चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी ती एक नवीन फ्लॅट घेण्यावरून चर्चेत हेती. आता ती एका पार्टीमध्ये दिसून आली ज्यामुळे तिला सध्या सोशल मिडियावर भरपूर ट्रोल केलं जात आहे. काजोल सध्या प्रेग्नंट असल्याच्या मुद्द्यावरून ट्रोल केलं जात आहे. पार्टीमध्ये घातलेल्या ड्रेसमध्ये दिसणाऱ्या लूकवरून तिला ट्रोल केलं जातं आहे.

17 मार्च रोजी धर्मा प्रोडक्शनच्या सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त करण जोहरकडून पार्टी देण्यात आली. या पार्टीमध्ये कैटरिना कैफ, विक्की कौशल, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होञा, कियारा अडवाणी, विजय देवरकोंडा यासह सिनेसृष्टीतील बड्या व्यक्ती दिसून आल्या. या पार्टीमध्ये काजोलही दिसून आली. या पार्टीमध्ये तीने काळ्या रंगाच्या ऑफ शॅाल्डर ड्रेस आणि पायामध्ये गोल्डन हिल्स घातलेले होते. दरम्यान या फोटोंमध्ये तिचे पोट थोडेसे जास्त दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याच लूकवरून तीला सोशल मिडियामध्ये प्रेग्नेंट असल्याचे तर्क लावून ट्रोल केले जाऊ लागले. पण तिच्या काही चाहत्यांनी ट्रोल्सना शांत करण्याचा प्रयत्न केला. एका कमेंटमध्ये तर एकजण असेही म्हणाला की या अभिनेत्रीमध्ये हिंमत आहे की ती जशी आहे तशीच शरीर घेऊन आली आणि तिने काहीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. अनेकांनी अभिनेत्रीला सुंदर दिसत असल्याचेही म्हटले.

काजोलच्या मुलांबद्दल बोलायचे झाले तर तिला दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव न्यासा आणि दुसऱ्या लहान मुलाचे नाव युग आहे. तिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायच तर, ती अलिकडच्या त्रिभंगा चित्रपटात दिसली होती आणि आता ती द लास्ट हुर्रे या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news