जळगाव : बी.एच.आर  बँक घोटाळ्यातील सुनील झंवर जामनेरात दाखल | पुढारी

जळगाव : बी.एच.आर  बँक घोटाळ्यातील सुनील झंवर जामनेरात दाखल

जळगाव,पुढारी वृत्‍तसेवा : संपूर्ण देशभरात गाजलेला बी.एच.आर. बँक घोटाळा यामध्ये जितेंद्र कंडारे व प्रमुख संशयित म्हणून सुनील झंवर होते. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते आमदार गिरीश महाजन यांच्या घरी लग्न कार्यात सहभागी झाले होते.

देशभर विखुरलेल्या बी.एच.आर या बँकेत लाखो रुपयांचा घोटाळा झाला. अनेक ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने अनेक आंदोलने करण्यात आली होती. पुण्यामध्ये  गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर व तत्कालीन अवसायक जितेंद्र कडारे यांना पोलिसांनी नाशिक येथून त्यांना अटक केली.

तसेच, त्यांना जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणी नुकतेच कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड न भरल्यामुळे बँकेत चार खाते सील करण्यात आले आहेत. बँकेतील घोटाळ्याच्या चौकशी सुरू असतानाच जामनेर येथे भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मुलीचे लग्नकार्याला मोठ्या हिरारीने सहभाग घेतला. येथे या घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर त्या ठिकाणी दिसून आले.

सुनील झंवर हे आमदार गिरीश महाजन यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आता मुलीचे लग्न असल्यामुळे झंवर यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. वरून सुनील झंवर व गिरीश महाजन यांचे सौख्य दिसून येत आहे.

Back to top button