ऑपरेशन गंगा : युक्रेनमधून ८०० लेकरांना सुखरुप आणणारी महाश्वेता चक्रवर्ती आहे तरी कोण ? | पुढारी

ऑपरेशन गंगा : युक्रेनमधून ८०० लेकरांना सुखरुप आणणारी महाश्वेता चक्रवर्ती आहे तरी कोण ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया-युक्रेन युद्धानंतर २४ वर्षीय महाश्वेता चक्रवर्ती  (Mahasweta Chakraborty) ही महिला वैमानिक चर्चेत आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यात केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम राबवली. या मोहीमेत महाश्वेताचे मोठे योगदान राहिले. युद्धग्रस्त युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना महाश्वेताने सुखरूप भारतात परत आणले. तिने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत ६ विमानांचे उड्डान केले.

पोलंड आणि हंगेरी येथून ६ विमानांचे उड्डाणे

महाश्वेता चक्रवर्ती हिने युक्रेनच्या पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर अडकलेल्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची सुटका केली. पोलंडमधून ४ आणि हंगेरीमधून २ निर्वासन उड्डाणे केली.

विद्यार्थ्यांना वाचवणे हा आयुष्यभराचा अनुभव ठरला

याबाबत महाश्वेता चक्रवर्ती यांनी सांगितले की, ऑपरेशन गंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचवणे हा माझ्यासाठी मोठा अनुभव आहे. आयुष्यभर याचा मला उपयोग होईल.

महाश्वेता यांना मध्यरात्री फोन करून त्यांना ऑपरेशन गंगा या मोहिमेसाठी निवडण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच तुम्हाला युद्धग्रस्त युक्रेनमधून अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात परत आणण्याचे आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर तिने ही जबाबदारी आत्मविश्वासाने घेतली आणि ती पूर्ण करून दाखवली.

महाश्वेता चक्रवर्ती ऑक्सिलियम कॉन्वेंट स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिचे लहानपासून पायलट होण्याचे स्वप्न होते. महाश्वेताची आई तनुजा चक्रवर्ती बंगाल भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष आहे. दरम्यान, याआधी महाश्वेता हिने ‘वंदे भारत’ या मिशनमध्ये भाग घेतला होता. कोरोना काळात जगभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यावेळी ‘वंदे भारत’ मिशन राबविण्यात आले होते. त्यावेळी तिने योगदान दिले होते.

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button