India vs Sri Lanka, Day 2 : श्रीलंकेला जडेजाचा तडाखा, नाबाद १७५ धावांची खेळी | पुढारी

India vs Sri Lanka, Day 2 : श्रीलंकेला जडेजाचा तडाखा, नाबाद १७५ धावांची खेळी

पुढारी ऑनलाईन डेस्क :

रवींद्र जडेजाने आपल्‍या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत नाबाद १७५ धावांची खेळी केली. भारताने आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला आहे.

श्रीलंकेविरुद्‍धच्‍या पहिल्‍या कसाेटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी साकारली. यानंतरही त्‍याने तुफानी खेळी करत १५२ धावा फटकावल्‍या.  जडेजाने  १६० चेंडूत आपलं शतक पूर्ण केले हाेते. यानंतर पुढील ५० धावा ५१ चेंडूत पूर्ण केले. त्‍याने यापूर्वी टी-२० मालिकेतही धमाकेदार कामगिरी केली होती. यानंतर त्‍याने आपल्‍या खेळीत सातत्‍य ठेवतकसोटीतही तुफानी खेळी केल्‍याने भारताने पहिल्‍या डावात ५०० धावांचा टप्‍पा पार केला आहे.

यापूर्वी २०१७-१८ मध्‍ये माेहाली मैदानावर रवींद्र जडेजाने ९० धावांची खेळी केली हाेती. मात्र शतकी खेळी साकारण्‍यात त्‍याला अपयश आले हाेते. मात्र आज त्‍याने दमदार खेळीचे प्रदर्शन करत शतकी खेळी करत पहिल्‍या डावात भारताला सुस्‍थितीत नेले. भारताने ८ गडी गमावत ५२७ धावा केल्‍या आहेत.

India vs Sri Lanka, Day 2 : रविचंद्रन अश्विनचे अर्धशतक

अश्विनने श्रीलंका विरूध्दच्या पहिल्या  कसोटीतील दुसऱ्या दिवशी आपले कसोटीमधील १२ वे अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने रविंद्र  जडेजासोबत ७व्या विकेटसाठी १६२ चेंडूत ११६ धावांची भागीदरी केली आहे. अश्विन ६१ धावांवर बाद झाला.

भारत आणि श्रीलंका यांच्या कसोटी सामन्यांतील दुसऱ्या दिवशी १०२ षटकांपर्यंतच्या डावात भारताने ४२६ धावा केल्या आहेत. यामध्ये  जडेजाने ५९.२६ च्या सरासरीने १३६ चेंडूत ८१ धावा केल्या तर त्याला दुसऱ्या बाजूने साथ देणाऱ्या अश्विनने ५५ चेंडूत ४१ धावा केल्या आहेत.

Back to top button