Vibhu Raghave : अभिनेता विभू राघवेची कॅन्सरशी झुंज, रूग्णालयातून शेअर केला व्हिडिओ | पुढारी

Vibhu Raghave : अभिनेता विभू राघवेची कॅन्सरशी झुंज, रूग्णालयातून शेअर केला व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन 

अभिनेता विभू राघवे  ( Vibhu Raghave ) सध्या कर्करोगाशी (कॅन्सर) झुंज देत रुग्णालयात दाखल आहे. विभूचा कॅन्सर स्टेज ४ वर पोहोचला आहे. विभूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. यानंतर मोहसिन खान, मोहित मलिक, जैन इमामसोबत अनेक कलाकारांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे.

विभू राघवे ( Vibhu Raghave ) याने नुकतेच इन्स्टाग्रामवर रूग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने हसत-हसत स्वत: ला कॅन्सर झाला असून तो ४ टप्प्यावर पोहोचला असल्याचे सांगितले आहे. आणखी एका व्हिडिओत आजाराविषयी सांगताना त्याच्या डोळ्यातून अचानक पाणी वाहताना दिसले. या व्हिडिओत तो रूग्णालयातील एका बेडवर दिसत असून त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मोठ्या धाडसाने आजाराशी झूंज देत असल्याचे  दिसून येत आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,  “मी रूग्णालयात असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. गेल्या काही दिवसापासून मी कॅन्सरशी लढा देत आहे. दोन आठवड्यांपूर्वी माझा कॅन्सर ४ टप्प्यात पोहोचल्याचे समजला आहे. हा कॅन्सर धोकादायक आहे. मी या आजारांशी लढा देईन असे मला आयुष्यात कधीही वाटले नव्हते. पण आता संगळ संपल्यासारखे वाटत आहे. सध्या मी चांगल्या डॉक्टारांच्या मार्गदर्शनाखाली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत. सगळे चाहते मी बराल होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. आशा आहे की, माझा तब्येत सुधारावी”.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत चाहते देखील कॉमेंन्टस करून प्रार्थना करत आहेत. यात बॉलिवूड अभिनेता शालीन मल्होत्रा याने ‘तू लवकरच बरा होवून घरी परतशील अशी आशा आहे.’ असे म्‍हटलं आहे. मोहसीन खानने विभूला धीर देत ‘मेरी जान, लवकरच भेटू. काळजी घे’ असे लिहिले आहे.  मोहित मलिकने धीराने घे, लवकरच आम्ही तुला पडद्यावर पाहू. तर जैन इमामने भाऊ, हसत राहा. मी तू लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. असे लिहिले आहे. चाहतेदेखील त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

विभू ‘निशा और उसके कझिन्स’आणि ‘सुवरीन गुग्गल- टॉपर ऑफ द इयर’ या मालिकेत दिसला. तर त्याने ‘रिदम’ आणि ‘पिचफोर्क’ या चित्रपटात झळकला.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by VIBHU k RAGHAVE (@vibhuzinsta)

 

View this post on Instagram

 

A post shared by VIBHU k RAGHAVE (@vibhuzinsta)

 

View this post on Instagram

 

A post shared by VIBHU k RAGHAVE (@vibhuzinsta)

Back to top button