पैठण : दांपत्यासह एकाला मारहाण करून सोन्याच्या दागिन्यासह २० हजारांचा मुद्देमाल लुटला | पुढारी

पैठण : दांपत्यासह एकाला मारहाण करून सोन्याच्या दागिन्यासह २० हजारांचा मुद्देमाल लुटला

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील राहटगाव व माळीवाडा शिवारात शुक्रवारी रात्री अज्ञात चार लूटमार करणाऱ्यांनी चाकूचा धाक दाखवून एका दांपत्यासह व्यापाऱ्याला मारहाण करून सोन्याचे दागिने, मोबाईल रोख रक्कम असे एकूण २० हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेतला.

राहटगाव फाटा येथे व माळीवाडा शिवारात शुक्रवारी रात्री अज्ञात चार लुटमार करणाऱ्या संशयितांनी विशाल दत्तात्रय दातवासे (रा. गणपती गल्ली, जुना जालना) व गोकुळ लक्ष्मण मसुळे (पॉपकॉर्न व्यापारी रा. आखतवाडा, ता. पैठण) यांना अडवून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. विशाल दातवासे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमत १२ हजार, मोबाईलची किंमत ४ हजार व नगदी दोनशे रुपये तसेच गोकुळ मसुळे यांच्या जवळचे नगदी ३ हजार रुपये व मोबाईल असे एकूण २० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे.

IPL Auction: लिलावाचे सूत्रसंचालन करणारे ह्यूग एडमिड्स पडले बेशुद्ध!

सदरील माहिती पोलिसांना मिळाल्याने त्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाचोड, बिडकीन,एमआयडीसी येथील हद्दीत नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या दोन्ही वेगवेगळ्या वेळात घडलेल्या घटनेचा अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९४,३४ प्रमाणे पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचलं का  

कोल्हापूर : करूळ घाटात कंटेनर पलटी : वाहतूक ठप्प

पैठण : गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीकडून पोलिसांनी मुद्देमाल केला जप्त

पैठण : वाळू तस्करांकडून महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Back to top button