अर्थसंकल्प 2022 : यंदाच्या बजेट दिवशीही शेअर बाजार राहिला सकारात्‍मक, गेल्या ९ वर्षात काय घडलं होतं? | पुढारी

अर्थसंकल्प 2022 : यंदाच्या बजेट दिवशीही शेअर बाजार राहिला सकारात्‍मक, गेल्या ९ वर्षात काय घडलं होतं?

पुढारी ऑनलाईन डेस्क

फेब्रुवारीच्‍या एक तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. सन २०१४ ते २०२१ या कालावधीत ९ केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाले. त्यावेळी शेअर बाजारमध्‍ये चढ-उतार पाहायला मिळाला हाेता. मात्र यंदाच्‍या अर्थसंकल्‍पादरम्यान शेअर बाजार सकारात्‍मक राहिला. अल्‍प चढ-उतार वगळता आज बाजार स्‍थिर राहिला.

बजेट सादर हाेण्‍यापूर्वी  काही दिवस अथवा बजेटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी किंवा मंदी येते. सन 2014 ते 2019 या कालावधीतील अर्थसंकल्प सादरीकरणाचा दिवस पाहता शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पहायला मिळत होती. ही अस्थिरता म्हणजे अर्थमंत्र्यांनी एखाद्या क्षेत्राविषयीबाबत असणाऱ्या तरतूदींची घोषणा केली कि, निफ्टी, बँक निफ्टीसह इतर इंडेक्समध्ये काही वेळातच शे-पाचशे अंकांची तेजी किंवा घसरण होत होती.

मात्र यंदाचा अर्थसंकल्प याला अपवाद राहिल्याचं पहायला मिळाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादरीकरण करत असताना शेअर बाजारावर मोठा परिणाम झालेला पहायला मिळाली नाही. आज शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 800 अंकांवरून 1000 अंकांनी वधारला. 170 अंकानी सुरू झालेला निफ्टी इंडेक्स 260 अंकावर पोहचला. तर 780 अंकांनी वधारलेली बँक निफ्टी इंडेक्स 450 अंकांपर्यंत खाली आली.

गेल्या दहा वर्षांत शेअर बाजाराने किती टक्के रिटर्न्स दिले ते पाहू…

कोरोना परिस्थितीमुळे सलग दोन वर्षे शेअर बाजार मोठ्या प्रमाणात अस्थिरतेसह कोसळल्याचे पहायला मिळाले. तर यंदा अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुपारी एक वाजेपर्यंत शेअर बाजार स्थिर होता. मात्र दुपारी एक वाजल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री झाल्याचे पहायला मिळाले. 1000 अंकांवर पोहचलेला सेन्सेक्स 250 अंकांपर्यंत खाली आला. तर 250 पेक्षा जास्त अंकांवर व्यवहार करणारी निफ्टी -13 अंकांपर्यंत तर 750 अंकांवर व्यवहार करणारी बँक निफ्टी – 35 अंकांवर आली होती.

काही काळ किंचितशी पडझड झाल्यानंतर निफ्टी, बँक निफ्टीमध्ये पुन्हा खरेदी झाली आणि रेडमध्ये असणारे इंडेक्स पुन्हा 250 ते 500 अंकापर्यंत वर गेले. अखेर दिवसाअखेरीस सेन्सेक्स 848 अंकांनी वधारून 1.46 टक्क्यांवर बंद झाला. तर निफ्टी 237 आणि बँक निफ्टी 530 अंकांनी वधारून बंद झाला.

हेही वाचा

Back to top button