नवज्योत सिंग सिद्धू, “काॅंग्रेसला फक्त काॅंग्रेसच हरवू शकते” | पुढारी

नवज्योत सिंग सिद्धू, "काॅंग्रेसला फक्त काॅंग्रेसच हरवू शकते"

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. मतदानासाठी केवळ एक महिनाच शिल्लक राहिला आहे. तरीही पंजाब काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांचा बंडखोरी स्वभाव लपून राहिलेला नाही. सिद्धू म्हणाले की, “काॅंग्रेसचा फक्त काॅंग्रेसच पराभव करू शकते”, त्यांच्या या वाक्यातून बंडखोरीची शक्यता दिसून येत आहे, असंही जाणकार सांगत आहेत.

पंजाबच्या राजकारणात अशी चर्चा होते आहे की, “मुख्यमंत्री पदाचा उमेदवार केला नसल्यामुळे सिद्धू खास नाराज आहे. त्यामुळे ते स्वतःच्या काॅंग्रेस पक्षावर ते अप्रत्यक्षपणे टीका करत असताना दिसत आहेत.” एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना सिद्धू म्हणाले की, “निवडणुकीत काॅंग्रेसला कोणी हरवू शकत नाहीत. जर काॅंग्रेसला कोणी हरवू शकत असतील तर काॅंग्रेसच हरवू शकते.”

काॅंग्रेसच्या भूमिकेवर भाष्य करताना सिद्धू म्हणाले की, “काॅंग्रेस एकजुटता दाखवत असेल तर पंजाबमध्ये काॅंग्रेसला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मला पदाची लालसा नाही. पंजाबच्या जनतेसाठी मला काम करायचं आहे”, असे सांगत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचं कौतुकही त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर दोघांच्या कोणताही मतभेद नाही, असंही सिद्धू यांनी माध्यमांना सांगितलं.

हे वाचलंत का? 

Back to top button