‘द बॅटमॅन’ 4 मार्च रोजी येणार | पुढारी

‘द बॅटमॅन’ 4 मार्च रोजी येणार

पुढारी ऑनलाईन

कोरोनामुळे प्रदर्शनापासून दीर्घकाळ रेंगाळलेल्या अनेक चित्रपटांपैकी एक म्हणजे अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनचा आगामी ‘द बॅटमॅन’. ( the batman) आता या चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह रीलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतात इंग्लिशसह हिंदी, तमिळ आणि तेलुगुध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मॅट रीव्हज यांनी केले आहे. रॉबर्ट प्रथमच ब्रुस वेन तथा बॅटमॅनच्या भूमिकेत आहे. रॉबर्टची या भूमिकेसाठी केलील निवड अनेकांना आवडली होती. शिवाय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन याने त्याच्या ‘द डार्क नाईट’ ट्रायोलॉजीमधून ‘बॅटमॅन’च्या चित्रपटांचा एक बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. त्यामुळे चाहत्यांना या नव्या बॅटमॅनबाबत उत्सुकता आहे. (the batman)

Back to top button