भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत वर्ग चार टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत वर्ग चार टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत इतिहास घडवला आहे. टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत वर्ग चार टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत भाविना पटेल हिने धडक मारली आहे. या स्‍पर्धेत टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत स्‍थान मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. जाणून घेवूया भाविनाच्‍या संघर्षमय प्रवासाविषयी…

एक वर्षाची असताना झाला पोलिओ

भाविनाचा जन्‍म ६ नोव्‍हेंबर १९८६ रोजी गुजरातमधील मेहसाना जिल्‍ह्यातील वडगर गावात मध्‍यमवर्गीय कुटुंबात झाला. एक वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. तिच्‍या कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला. पाच जणांच्‍या कुटुंबात भाविनाचे वडील एकटेच कमावते होते. त्‍यामुळे त्‍यांना भाविनावर उपचार करण्‍यात मर्यादा आल्‍या. तिच्‍यावर विशाखापट्‍टनम येथे शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. मात्र सर्वांच्‍या पदरी निराशाच पडली. यानंतर भाविनाचा व्‍हिलचेअरवरुन प्रवास सुरु झाला.

खडतर परिस्‍थितीशी दोन हात

एककडे घरची गरीबी तर दुसरीकडे पोलिओग्रस्‍त अशा अत्‍यंत खडतर परिस्‍थितीशी दोन हात करणाचा निर्धार भाविनाने केला. व्‍हीलचेअरवर बसून तिने टेबल टेनिसचा सराव सुरु केला. अथक सराव आणि दृढनिर्धाराच्‍या जोरावर भाविकाने २०११मध्‍ये पीटीटी थायलंड टेबल टेनिस स्‍पर्धा जिंकली. ही स्‍पर्धा जिंकत तिने आंतरराष्‍ट्रीय पातळीवर स्‍वत:ची ओळख निर्माण केली. यानंतर २०१३मध्‍ये बिजिंग पॅरा आशियाई स्‍पर्धेत वर्ग चार टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत तिने धडक मारली. येथे रौप्‍य पदकावर आपली मोहर उमटवली. यावेळी भाविकाचे रॅकिंग हे दुसर्‍या क्रमाकांचे होते. यानंतर चार वर्षांनी तिने बिजिंगमध्‍ये अशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्‍पियनशिप स्‍पर्धेत रौप्‍य पटकाले.

भारताचे टेबेल टेनिसमधील रौप्‍यपदक केले निश्‍चित

टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत तिने उपांत्‍य फेरीत चीनच्‍या पॅडलर झांग मियाओचा पराभव केला.

ती अंतिम फेरीत पोहचल्‍याने भारताचे रौप्‍य पदक निश्‍चित झाले आहे.

ती प्रथमच पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत सहभागी झाली आहे. आतंरराष्‍ट्रीय पातळीवर केलेल्‍या कामगिरीने भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. आता रविवारी २९ ऑगस्‍ट रोजी तिचा सामना चीनच्‍या खेळाडूबरोबर आहे. आता भाविका पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत सोनरी मोहर उमटविणार का याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.

भाविना तुला खूपखूप शुभेच्‍छा. उपांत्‍य फेरीत तू खूपच शानदार खेळाचे प्रदर्शन केले. संपूर्ण देशाला तुझ्‍यावर गर्व आहे. आम्‍ही सर्वजण अंतिम फेरीतील सामन्‍यावेळी तुला प्रोत्‍साहन देणार आहोत. अंतिम सामन्‍यावेळी कोणाताही दबाव घेवू नकोस, तुझाकडे असणार्‍या प्रतिभेचा पूर्णपणे वापर कर. तुझे अंतिम फेरीतील यश देशासाठी एक नवी प्रेरणा असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news