महेंद्रसिंह धोनीची बॅट आली इस्लामपुरात | पुढारी

महेंद्रसिंह धोनीची बॅट आली इस्लामपुरात

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची बॅट इस्लामपूरमध्ये क्रिकेटप्रेमींनी आणली आहे. ही बॅट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी आणली आहे. त्यांनी ही बॅट मित्राला देण्यासाठी आणली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आणि भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. राजवर्धन क्रिकेटप्रेमी आहेत. ते नेहमी महेंद्रसिंग धोनी यांच्या संपर्कात असतात.

राजवर्धन यांनी चेन्नईमध्ये धोनीची भेट घेवून वापरलेली बॅट धोनीच्या स्वाक्षरीसह आणली आहे. राजवर्धन यांनी ही बॅट त्यांचे मित्र संग्राम पाटील यांना दिली आहे.

महेंद्रसिंग धोनी आज क्रिकेटच्या मैदानात नसला तरी त्याचे फॅन्स आजही आहेत. तो नेहमी चर्चेत असतो. नुकतीच त्याने हेअर स्टाईल बदलली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. जेतेपदाचे दावेदार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू १३ ऑगस्ट रोजी यूएईसाठी रवाना झाले आहेत.

आयपीएलच्या तयारीसाठी दोन्ही संघ एक महिन्यापूर्वी यूएईला जात आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर उभा ठाकणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, ऋतुराज गायकवाड यांनी यूएईत गेले आहेत.

हे ही वाचलत का :

जपानी मुलगी बोलतेय चक्क मराठी

Back to top button