ENGvsIND : आर. अश्विन करतोय डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा सराव! | पुढारी

ENGvsIND : आर. अश्विन करतोय डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा सराव!

लीड्स : पुढारी ऑनलाईन

भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज आर. अश्विन सध्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. पण, त्याचा भारताच्या अंतिम अकराच्या संघात समाविष्ट नाही. लीड्समधील कसोटी सामन्यात त्याला अंतिम अकराच्या संघात खेळण्याची संधी मिळेल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र भारताने आपले लॉर्ड्सवरील विनिंग कॉम्बिनेशन न बदलण्याचा निर्णय घेतला.

मात्र आर. अश्विन अंतिम अकरा संघात नसण्यावर नेटकऱ्यांनी आणि क्रिकेट जाणकारांनी टीका केली होती. पण, या गोष्टीचा आर. अश्विनवर कोणताही परिणाम झालेला नाही. तो संघात स्थान मिळाने नाही म्हणून निराश नाही उलट तो आपल्याला दररोज वेगवेगळ्या गोष्टीतून प्रेरणा कशी मिळेल याचा शोध घेत आहे. अश्विनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फलंदाजीचा सराव करतानाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तो डाव्या हाताने फलंदाजी करत आहे.

हा फोटो शेअर करुन आर. अश्विन म्हणतो की, ‘प्रत्येक दिवशी वेगळे काही करण्याची आग विझत नाही.’ या फोटोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. याचबरोबर अश्विनच्या या फोटोवर शिखर धवननेही प्रतिक्रिया दिली. त्याने ‘भाई डाव्या हाताने फलंदाजी करताना खूप छान दिसत आहेस.’ अशी प्रतिक्रिया दिली.

आर. अश्विन तीनही कसोटीत बेचवर

भारताचा संध्याच्या संघातील सर्वात जास्त विकेट घेणारा फिरकीपटू असलेला आर. अश्विन इंग्लंड दौऱ्यावरील तीनही कसोटी सामन्यात खेळलेला नाही. अश्विन या दौऱ्यापूर्वी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळला होता. या सामन्यात त्याने ४ बळी मिळवत २९ धावा केल्या होत्या.

हा सामना भारतीय संघ ८ विकेट्सनी हरला होता. त्यानंतर पहिल्या कसोटीत भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि रविंद्र जडेजाला घेऊन मैदानात उतरला होता. दुसऱ्या लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर ऐवजी इशांत शर्माला संधी देण्यात आली होती.

तिसऱ्या कसोटीत संघात बदल होईल आणि आर. अश्विनला संधी मिळेल असे सर्वांना वाटत होते. मात्र संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटीतील विनिंग कॉम्बिनेशन न बदलण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : अशी फोडली जाते खायी

Back to top button