

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बाल लैंगिक अत्याचार : शहरात बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. शहरात बाल लैंगिक अत्याचाराचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
आठ वर्षाच्या शाळकरी मुलानेच शेजारी राहणार्या तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला.
पुणे शहरातील मध्यमवर्गीय घरातील एका आठ वर्षाच्या बालकाने हा घृणास्पद प्रकार केला आहे. बाल लैंगिक अत्याचार समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
अधिक वाचा
अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार पुणे पोलिसांनी रविवारी उघडकीस आणला. बालिकेला आईने गुड टच व बॅड टच ही संकल्पना शिकवल्याने तिने झाला प्रकार आई-वडिलांना सांगला.
त्या बालका विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करणार्यात आली. झाल्या प्रकाराने पोलिसही अवाक झाले आहेत. इतका लहान मुलगा असे कृत्य कसे करू शकतो? असा प्रश्न त्यांना पडला.
अधिक वाचा
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुलगा अभ्यासासाठी मोबाईल पाहत होता, त्यावेळी त्याचे सोशल मिडीयावरील अश्लील व्हिडिओकडे लक्ष गेले असण्याची शक्यता आहे.
मोबाईलच्या अती वापरानेच कृत्य मुलाकडून झाले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
हे ही वाचलं का?
VIDEO : आरे कॉलनीतलं गावदेवीचं ही जुनं मंदिर आपण पाहिलंय का?