क्रिकेट : ईशान किशन, सुर्यकुमारचे वनडेत प्रदार्पण | पुढारी

क्रिकेट : ईशान किशन, सुर्यकुमारचे वनडेत प्रदार्पण

कोलोंबो; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि श्रीलंका दरम्यान पहिला वनडे क्रिकेट सामना कोलंबो येथे खेळला जात आहे.

हा वनडे क्रिकेट सामना आर प्रेमदास स्टेडियममध्ये रंगला असून यजमान श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LIVE UPDATE :

कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ७ गडी राखून यजमान श्रीलंका संघाचा पराभव केला. शिखर धवनच्या ९५ चेंडूत नाबाद ८५ धावा, बर्थडे बॉय ईशान किशनच्या ४२ चेंडूंत ५९ धावा आणि पृथ्वी शॉच्या २४ चेंडूत ४३ धावा यांच्या जोरावर टीम इंडियाने ३६.४ षटकांत २६३ धावांचे लक्ष्य आरामात गाठले. सुर्यकुमार यादव नाबाद ३१ (२०), मनिष पांडे २६ (४०) यांनी ही टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

धवनने २३ धावा करताच ६ हजार धावा बनवण्याचा विक्रम केला. धवनने १४० इनिंगमध्ये हा विक्रम केला. वेगवान ६ हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हशिम अमला पहिल्या क्रमांकावर आहे. आमलाने १२३ एकदिवसीय डावात ६ हजार धावा पूर्ण केल्या. दुसर्‍या क्रमांकावर भारताचा विराट कोहली आहे.

टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शिखर धवनने कॅप्टन्सी इनिंग खेळली. टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शिखर धवनने कॅप्टन्सी इनिंग खेळली. त्याने ३३ वे अर्धशतक ठोकले. तसेच वनडेमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताला तिसरा धक्का बसला आहे. मनिष पांडे बाद झाला आहे. ३०.४ व्या षटकात त्याचा अडसर धनंजय डिसिल्वाने दूर केला. यावेळी ३१ षटकांअखेर भारताची धावसंख्या ३ बाद २१७ होती. शिखर धवन आणि मनिष पांडे यांच्यात ७२ धावांची भागिदारी झाली.

भारताला तिसरा धक्का बसला आहे. मनिष पांडे बाद झाला आहे. ३०.४ व्या षटकात त्याचा अडसर धनंजय डिसिल्वाने दूर केला.

इशान किशन बाद, भारताला दुसरा धक्का!

१७.५ व्या षटकात भारताचा इशांत किशनच्या रुपात दुसरा धक्का बसला. संदकनने त्याला बाद केले. इशानने ४२ चेंडूत ५९ धावा केल्या. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार ठोकले. १४०.४८ च्या स्ट्राईक रेटने त्याने फटकेबाजी केली. कर्णधार शिखर धवन सोबत त्याने ८५ (७४) धावा केल्या.

इशान किशनचा पहिल्याच ‘वनडे’त ‘50’ चा तडका!

इशान किशनने वनडे प्रदार्पणात अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत ५२ धावा फटकावल्या. त्याची आक्रमक फटकेबाजी पाहण्यासारखी होती. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ८ चौकार ठोकले. डीप मिड विकेटवरून असलांकाला चौकार ठोकत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

शिखर धवन आणि इशान किशन यांनी दुस-या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारीचा टप्पा ओलांडला.

१३ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर इशान किशनने चौकार लगावला. याचबरोबर भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या.

१० व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ९१ होती. इशान २४ (१४) तर शिखर धवन १३ (२२) धावांवर खेळत होते.

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर मैदानात उतलेल्या आणि आपला पहिलाच वनडे सामना खेळणा-या इशान किशनने आपल्या बॅटने कमाल केली. त्याने आठव्या षटकात सलग तीन चौकार ठोकले. त्याची ही फटकेबाजी पाहण्यासारखी होती. धनंजय डिसिल्वाने हे षटक फेकले. या षटकात १२ धावा मिळाल्या.

पृथ्वी शॉ च्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. त्याने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. या आक्रमक खेळीत त्याने चौकार लगावले. ९ चौकार ठोकले. त्याने शिखर धवन सोबत ५८ धावांची (३३ चेंडू) भागिदारी केली. धनंजय डीसिल्व्हाने पृथ्वीला बाद केले. सीमारेषेवर फर्नांडोने त्याचा झेल पकडला.

पाचव्या षटकातही पृथ्वी शॉने आक्रमकपणे २, ५ आणि ६ व्या चेंडूवर चौकार लगावले. चमेरा च्या या षटकात १२ वसूल केल्या. याचबरोबर भारताच्या ५० धावा पूर्ण झाल्या. पाचव्या षटका अखेर भारताची धावसंख्या बिनबाद ५७ होती.

चौथ्या षटकात पृथ्वी शॉने उदनाच्या बॉलिंगची फिसे काढली. त्याने दुस-या, तिस-या आणि चौथ्या चेंडूवर सलग तीन चौकार लागवले. चौथ्या षटकात १४ वसूल केल्या. याचबरोबर भारताची चौथ्या षटकाअखेर धावसंख्या बिनबाद ४५ होती.

शिखर धवनने चौकार ठोकून आपले खाते उघडले. त्याने चमेराला चौकार लगावला. त्यानंतर एक धा काडून स्ट्राईक पृथ्वीकडे दिले. तिस-या षटका अखेर भारताची धावसंख्या बिनबाद ३१ होती.

दुस-या षटकातही पृथ्वीने श्रीलंकेचा गोलंदाज उदना याला दोन चौकार लगावले आहेत. दुस-या षटकात उदना याने तीन वाईड बॉल टाकले. त्यामुळे भारताला या एका षटकात १३ धावा मिळाल्या. याचबरोबर दुस-या षटकाअखेर भारताची धावसंख्या बिनबाद १९ अशी होती.

टीम इंडियाचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात उतरले आहेत. श्रीलंकेचा गोलंदाज चमेरा याने पहिले षटक फेकले. या षटकाचा पहिला चेंडू डॉट गेला. त्यानंतर अचानक आक्रमक पवित्रा घेत पृथ्वी शॉ याने दुस-या आणि तिस-या चेंडूवर चौकार ठोकले. त्यानंतर एक धा काडून पृथ्वीने स्ट्राईक कर्णधार शिखर धवनकडे दिले. यानंतर शिखरने पाचवा आणि सहावा चेंडू खेळून काढले. पहिल्या षटका अखेर भारताचा बिनबाद ९ असा स्कोअर होता.

श्रीलंकेचे भारतासमोर विजयासाठी २६३ धावांचे आवाहन

श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी २६३ धावांचे लक्ष्य दिले आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकेचा संघ भारताच्या कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चहर या गोलंदाजांसमोर दडपणाखाली खेळताना दिसला. तिघांनीही २-२ विकेट घेतल्या.

श्रीलंकेकडून चामिका करुणरत्नेने आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत शानदार फटकेबाजी केली. तो ३५ चेंडूत ४३ धावांवर नाबाद राहिला.

त्याचवेळी दुषमंत चामिराने ७ चेंडूत १३ धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाने अखेरच्या ५ षटकांत ५२ धावा वसूल केल्या आणि २ फलंदाज गमावले.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ५० षटकांत ९ बाद २६२ धावा करू शकला. कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. त्याच वेळी, चरित अस्लांकाने ३८ धावा केल्या. अविष्का फर्नांडो-मिनोद भानुका आणि अस्लंका-शनाका या दोन जोड्यांनी प्रत्येकी ४९ धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनीही १-१ गडी बाद केले.

चमिका करुणारत्ने अखेरच्या षटकात चौकार-षटकारांची फटकेबाजी केली. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या २५० च्या पुढे जाण्यास मदत झाली. अखेरचे ५० वे षटक भुवनेश्वरने फेकले. पण ते टीम इंडियाला महागात पडले. षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. दुस-या चेंडूवर दोन धावा काढल्या. तर तिस-या आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. पण पाचव्या चेंडूवर त्याला एकच धाव घेता आली. तर अखेरच्या सहाव्या चेंडूवर दुश्मंथ चमेरा धावचित झाला. त्याला भुवनेश्वर कुमारनेच धावबाद केले. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या ९ बाद २६२ होती.

अधिक वाचा :

चमिका करुणारत्ने अखेरच्या षटकात चौकार-षटकारांची फटकेबाजी केली. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या २५० च्या पुढे जाण्यास मदत झाली. अखेरचे ५० वे षट भुवनेश्वरने फेकले. पण ते टीम इंडियाला महागात पडले. षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. दुस-या चेंडूवर दोन धावा काढल्या. तर तिस-या आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. पण पाचव्या चेंडूवर त्याला एकच धाव घेता आली. तर अखेरच्या सहाव्या चेंडूवर चमिका धावचित झाला. त्याला भुवनेश्वर कुमारनेच धावबाद केले.

४६.५ व्या षटकात हार्दिक पांड्याने श्रीलंकेला आठवा धक्का दिला. त्याने ईसूरु उदनाला बाद केले. इसुरुने ९ चेंडूत ८ धावा केल्या. यावेळी श्रीलंकेची धाव संख्या ८ बाद २२२ होती.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका बाद झाला आहे. हा श्रीलंकेला सातवा धक्का आहे. शनाकाने ५० चेंडूत ३९ धावा (२ चौकार, १ षटकार) केल्या. युजवेंद्र चहलने हार्दिक पांड्या करवी त्याला झेलबाद केले.

श्रीलंकेची सहावी विकेट पडली आहे. वनिंदू हसरंगा (७ चेंडू ८ धावा) बाद झाला. दिपक चहरने त्याला ३९.३ व्या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या ६ बाद १८६ होती.

चरिथ असलांकाच्या (६५ चेंडूत ३८ धावा) रुपात श्रीलंकेला पाचवा धक्का बसला आहे. त्याला दीपक चहरने ३७.२ व्या षतकात बाद केले. इशान किशनने चरिथ असलांकाचा झेल पकडला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या ५ बाद १६६ होती. असलांकाने कर्णधार दासुन शनाका सोबत ४९ धावांची बागिदारी केली.

श्रीलंकेच्या १५० धावा पूर्ण झाल्या आहेत. ३४.३ व्या षटकांत यजमान संघाने दीडशे धावांचा टप्पा पार केला. ३५ व्या षटकाअखेर त्यांची धावसंख्या ४ बाद १५१, तर ३६ व्या षटका अखेर धावसंख्या ४ बाद १५६ होती. यावेळी खेळेपट्टीवर चरिथ असलांका आणि दासुन शनाका हे दोघे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करत होते.

२४.४ व्या षटकात कृणाल पंड्याने भारताला पुन्हा एकदा यश मिळवून दिले. त्याने धनंजया डी सिल्वा (२७ चेंडूत १४ धावा)ला माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने त्याचा झेल पकडला. यावेळी श्रीलंका संघाची धावसंख्या ४ बाद ११७ होती.

टीम इंडियाचा फिरकीपटूने आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. त्याने श्रीलंकेच्या संघाला एकाषटकात दोन धक्के दिले. भानुका राजपक्षे (२२ चेंडूत २४) आणि मिनोद भानुका (४४ चेंडूत २७ धावा) यांना १६ व्या षटकाच्या अनुक्रमे पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर बाद केले. राजपक्षेचा झेल शिखर धवने आणि भानुकाचा झेल पृथ्वी शॉने पकडला. यावेळी यजमान श्रीलंका संघाची धावसंख्या ३ बाद ८९ होती.

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने श्रीलंकेला पहिला झटका दिला. सामन्याच्या त्याच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्याने ९.१ व्या षटकात अविष्का फर्नांडो बाद केले. मनिष पंड्याने त्याचा झेल पकडला. अविष्का फर्नांडोने ३५ चेंडूत ३२ धावा केल्या आपल्या संयमी खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या १० षटकांत एक बाद ५७ होती. अनुष्का आणि भानुका यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागिदारी केली.

श्रीलंकेचे सलामीवीर अविष्का आणि भानुका यांनी संघाला संयमी सुरुवात करून दिली. साडेचारच्या धावगतीने त्यांनी पहिल्या सात षटकात बिनबाद ३२ धावा केल्या.

दीपक चहरने भारताकडून दुसरे षटक फेकले. या षटकात अविष्का फर्नांडोने त्याला दोन चौकार लगावले. यासह श्रीलंकेने दोन षटकांनंतर कोणतीही विकेट न गमावून १४ धावा केल्या.

श्रीलंकेचे सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोड भानुका फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरले. भारताकडून पहिले षटक उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने फेकले. पहिल्या षटकात यजमान श्रीलंकेने ४ धावा केल्या.

असे आहे कोलंबो मधील हवामान

श्रीलंकेच्या हवामान खात्याने रविवारी कोलंबोमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पावसामुळे दोन्ही संघांच्या समस्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामन्यावर किती परिणाम होईल याबद्दल अद्याप तरी काही सांगता येत नाही.

श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूंचे निलंबन झाले आहे…

इंग्लंड दौर्‍यादरम्यान जैव-सुरक्षित वातावरणाचे (बायो बबल) उल्लंघन केल्याबद्दल श्रीलंकेने आपल्या काही क्रिकेटपटूंचे निलंबन केले आहे. यात तीन प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे विकेटकिपर निरोशन डिकवेला, फलंदाज कुशल मेंडिस आणि दनुष्का गुणथिलाका यांचे निलंबन करण्यात आले आहे.

शिखर धवनकडे टीम इंडियाचे नेतृत्व

दरम्यान, शिखर धवन प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करत आघे. शिखर धवनला वयाच्या ३५ व्या वर्षी आणि २२५ दिवसांनी भारतीय वनडे संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाली आहे.

शिखर धवन हा भारताकडून कर्णधार पद भूषवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह तो एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणारा भारताचा २५ वा खेळाडू आहे.

ईशान किशनचा वाढदिवस

आजच्या सामन्याच्या माध्यमातून इशान किशन आणि सूर्यकुमार यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहेत. आज युवा यष्टीरक्षक ईशान किशनचा वाढदिवस देखील आहे. त्याच्यासाठी ही अनोखी भेट ठरली आहे.

भारताचा संघ असा :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

श्रीलंकेचा संघ असा :

अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिकिका करुणारत्ने, इसुरु उदाना, दुशमंत चमीरा, लक्ष संदकन

अधिक वाचा :

Back to top button