

श्रीगोंदा (नगर) ; पुढारी ऑनलाइन : अहमदनगर जिल्ह्यात खून करण्यता आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात खून झाल्यावर एकच खळबळ माजली होती. पांडुरंग पवार (रा. पिंपळनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात खून हा गोळी घालून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा : कर्नाटक राज्यात कोरोनाबळी शेतकर्यांना कर्जमाफी
देवदैठण येथील शिरूर रस्त्यानजीक एक मृतदेह आढळून आला होता. बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मयत व्यक्तीच्या डोक्यात गोळी लागली असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.
बेलवंडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयताची ओळख पटवली. मयत पांडुरंग पवार हे अन्य काही लोकासमवेत बाहेर गेले होते ते परत घरी आलेच नाहीत. आज त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस पथकाने त्याच गावातील काही संशयिताना ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा : अफगाणिस्तानमधील सुरक्षा संकट अमेरिकेमुळेच : चीन
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या मयताचा खून कुणी केला , त्या पाठीमागील कारण काय याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले, मयताची ओळख पटली आहे. खून कुणी व कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू आहे लवकरच त्याचा उलगडा होईल.
हे ही वाचा :