अफगाणिस्‍तानमधील सुरक्षा संकट अमेरिकेमुळेच : चीनचा आराेप | पुढारी

अफगाणिस्‍तानमधील सुरक्षा संकट अमेरिकेमुळेच : चीनचा आराेप

बीजिंग; पुढारी ऑनलाईन :  अफगाणिस्‍तानमधील सुरक्षा संकट याला अमेरिकाच जबाबदार आहे, असा गंभीर आरोप चीनने केला आहे. अफगाणिस्‍तानमधील सुरक्षा आणि शांततेबाबत अमेरिका आपल्‍या कर्तव्‍यापासून पलायन करत आहे. येथून सर्व सैनिक हटविण्‍याचा निर्णय घाई गडबडीत घेण्‍यात आला, असेही चीनने म्‍हटले आहे.

अमेरिका आपली जबाबदारी आणि कर्तृव्‍यापासून पलायन करत आहे, अशी टीका चीनच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचो प्रवक्‍ता वांग वेनबिन यांनी केली.

अफगाणिस्‍तानमधून अमेरिकी सैन्‍य हटविण्‍याचा निर्णय घाईगडबडीत घेण्‍यात आला. अफगाणमधील नागरिकांवर युद्‍ध लादले जात आहे. अफगाणिस्‍तानमधील सध्‍या निर्माण झालेल्‍या सुरक्षा संकटास सर्वस्‍वी अमेरिकाच जबाबदार असल्‍याचे आरोपही त्‍यांनी केला.

चीनमध्‍ये होणार्‍या सहकार्य बैठकीत भारत, रशिया, पाकिस्‍तान आणि मध्‍य आशियाई देश अफगाणिस्‍तानमधील सुरक्षा प्रश्‍नावर चर्चा करण्‍यास तयार आहेत.

अफगाणिस्‍तानमधील सुरक्षा व्‍यवस्‍था गंभीर आहे. त्‍यामुळे चीनने आपल्‍या नागरिकांना स्‍वगृही बोलवले आहे. यातील २२ नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले आहे.

दहशतवादी संघटना तालिबानने अफगाणिस्‍तानमधील अनेक जिल्‍ह्यांवर कब्‍जा केल्‍याचा दावा केला आहे. तर अनेक जिल्‍ह्यातून अफगाण लष्‍कराच्‍या सैनिकांनी माघार घेतली आहे.

अमेरिकेने सर्व सैनिकांना अफगाणिस्‍तानमधून हटविले आहे. त्‍यामुळे देशातील ८५ टक्‍के भूभागावर बंडखोरांनी वर्चस्‍वनिर्माण केल्‍याचा दावा तालिबानच्‍या वतीने करण्‍यात आला आहे. मात्र अफगाणिस्‍तानच्‍या प्रशासनाने याचा इन्‍कार केला आहे.

हेही वाचका का ?

व्‍हिडिओ पहा : पावसाळ्यातल्‍या रानभाज्‍या टेस्‍ट केल्‍या का?

Back to top button