

अमरावती, पुढारी वॄत्तसेवा : अमरावती : प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणी ने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणाची तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप तरुणी च्या कुटुंबीयांनी केला आहे.
अधिक वाचा:
शनिवारी भर पावसात शेकडो नातेवाईकांनी पोलिस आयुक्तालय व फ्रेजरपुरा ठाण्यावर धाव घेऊन तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली.
पोलिसांनी आरोपी कुणाल प्रल्हाद मेश्राम (३२) याच्यासह त्याच्या आईविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.
शहरातील २६ वर्षीय तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना, तिची ओळख एका वाचनालयात कुणाल मेश्रामशी झाली होती.
कुणाल हा तिच्या घराशेजारीच राहत असल्याने दोघांत मैत्री झाली. त्यातून प्रेमसंबंध सुरू झाले.
अधिक वाचा:
दोन ते तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रेमप्रकरणात कुणालने लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले.
नोकरी लागल्यावर लग्न करू, असे कुणालने तरुणीला सांगितले होते. परंतु रेल्वे विभागात गुडगार्ड पदावर नोकरी लागल्यानंतरही कुणाल लग्नासाठी टाळाटाळ करीत होता.
अधिक वाचा:
त्यामुळे चार महिन्यांपूर्वी तरुणी थेट कुणालच्या घरी पोहोचली. परंतु कुणालच्या कुटुंबियांनी तिला अपमानस्पद वागणूक देऊन घरातून हाकलून लावले.
त्यामुळे १८ जुलै रोजी तरुणीने अकोला असलेल्या कुणालशी फोनवर संपर्क केला.
त्यावेळी त्यानेही तरुणीला अश्लिल शिविगाळ करून लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने १९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास विषप्राशन केले. त्यानंतर कुटुंबियांनी तिला पारश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
उपचारादरम्यान तिचा २३ जुलै रोजी मृत्यू झाला.
१९ जुलै रोजी तरुणी रुग्णालयात दाखल असताना, तिचे वडील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कुणाल विरोधात तक्रार देण्यासाठी पोहोचले.
परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. २ जुलै रोजी पुन्हा तरुणीचे नातेवाईक ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बॉटल व ग्लास जप्त केला.
२३ जुलै रोजी पोलिसांनी तरुणीच्या वडिलांचा जबाब नोंदविला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कारवाई केली नाही.
त्यामुळे अखेर नातेवाईकांनी पोलिस आयुक्त कार्यालय व फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक देऊन आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली, अशी माहिती मृत तरुणीचे मामा प्रा. भरत ऊर्फ अविनाश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचलेत का:
पहा व्हिडिओ: शहराला महापुराचा विळखा