Day-Night from Space : अंतराळातून असे दिसतात दिवस आणि रात्र…

Day-Night from Space : अंतराळातून असे दिसतात दिवस आणि रात्र…
Published on
Updated on

वॉशिंग्टन : Day-Night from Space : अनादी काळापासून दिवस आणि रात्रीचा खेळ पृथ्वीवर सुरू आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाच स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरत असते. त्यामुळेच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात सूर्यप्रकाश आणि सावलीचा हा खेळ रंगत असतो. दिवसाच्या चोवीस तासांमध्ये सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्रीचा समावेश असतो. अंतराळातून हे सर्व कसे दिसते याची अनेकांना उत्सुकता असते. प्रयोगशाळेतील पृथ्वीचा गोल फिरवत त्यावर प्रकाशझोत टाकल्यावर जे द़ृश्य दिसते तसेच खरे तर वास्तवातील पृथ्वी व सूर्यप्रकाशाचेही द़ृश्य दिसते!

संबंधित बातम्या:

पृथ्वीवर दिवस आणि रात्रीला विभागणार्‍या रेषेला 'टर्मिनेटर' असे म्हटले जाते. अंतराळातून ही रेषा कशी दिसते हे सोबतच्या छायाचित्रात दर्शवले आहे. हा नजारा दर्शवणारा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. टर्मिनेटर एक काल्पनिक रेषा असते जी पृथ्वीवर दिवस आणि रात्रीच्या सीमा निर्माण करते. ही रेषा सतत चालत असते. (Day-Night from Space)

पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या भ्रमणाबरोबरच ती फिरत असते. सोशल मीडियावर या टर्मिनेटर लाईनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे की दिवस आणि रात्रीला विभागणारी ही रेषा कशी इकडून तिकडे फिरत असते. टर्मिनेटर लाईन ही नेहमीच फोटोग्राफर्स आणि अंतराळवीरांना अतिशय आवडत आलेली आहे. अंतराळातून या रेषेचे द़ृश्य अतिशय सुंदर दिसत असते. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने अनेक लोकांना थक्क केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news