NASA : ‘नासा’ मोहिमेत अंतराळवीरांऐवजी रोबो!

NASA : ‘नासा’ मोहिमेत अंतराळवीरांऐवजी रोबो!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 'नासा'ने आपल्या अंतराळ मोहिमांबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 'नासा' यापुढे जेथे शक्य आहे, तेथे आपल्या अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळवीरांमध्ये रोबोना पाठवेल आणि हे रोबोच दुसर्‍या ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेतील. या उपक्रमामुळे मानवी अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागण्याची भीती नसेल, असे 'नासा'ने म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

मागील कित्येक वर्षांपासून पृथ्वीवरील संशोधक अंतराळयात्रा करत आले आहेत. यातील प्रत्येक अंतराळ मोहिमेचा उद्देश वेगळा असतो. कधी एखाद्या ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी तर कधी एलियन्सच्या शोधासाठी अशा मोहिमा सातत्याने आखल्या जातात. आता प्रत्येक वेळी काही अशा मोहिमा यशस्वी होत नाहीत. काही वेळा अंतराळ वीरांना यात आपल्या प्राणाचे मोलही मोजावे लागते. त्या अनुषंगाने 'नासा'ने रोबोंना पाचारण करण्याच्या उपक्रमावर नव्याने विचार सुरू केला आहे. हे रोबो आऊटर स्पेसमध्ये काम करतील आणि त्याची माहिती पृथ्वीवरील संशोधकांकडे पोहोचवतील, असे 'नासा'चे नियोजन आहे.

'नासा'ने टेक्सासमधील टेक फर्म अ‍ॅपट्रोनिक व इंक यांच्याशी याबाबत काही करार संमत केले आहेत. हे फर्म ह्यूमनॉईड रोबो तयार करतात. सध्या हे रोबो पृथ्वीतलावरील कारखान्यात कार्यरत आहेत. मात्र, ते 'नासा'वर देखील उत्तम काम करू शकतात, याची 'नासा'ला खात्री वाटते. अ‍ॅपट्रोनिकने आपल्या वेबसाईटवर याबाबत अधिक सविस्तर माहिती दिली आहे. अंतराळात पाठवल्या जाणार्‍या रोबोची उंची 5 फूट 8 इंच आणि वजन 73 किलो इतके असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news