

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत लवकरच आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणार आहे. त्यामुळे इथून पुढे अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश मिळून अवकाशातील मोहिमा राबवतील. ओव्हल ऑफिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या भेटीपूर्वी अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
याआधी अमेरिकेत बाह्य अवकाश करार 1967 अंतर्गत करार झाले होते. पण आर्टेमिस अॅकॉर्ड्स हे 21 व्या शतकातील अवकाशातील मोहीम संदर्भातील नवे नियम आहेत. नवनवीन प्रयोग करण्यासाठी या अंतर्गत भारत आणि अमेरिका पुढील वर्षी अवकाश स्थानकावर संयुक्त मोहीम राबवणार आहेत.
हेही वाचा