हिमाचलमधील गाव, जेथे कोणीही बांधू शकत नाही दुमजली घर! | पुढारी

हिमाचलमधील गाव, जेथे कोणीही बांधू शकत नाही दुमजली घर!

चंदीगढ : भारतात आजही गावखेड्यांमध्ये अनेक जुन्या रूढी, परंपरा आताही कटाक्षाने पाळल्या जातात. हिमाचल प्रदेशमध्येही असेच एक गाव आहे, जेथे कोणीही चक्क दुमजली घर बांधू शकत नाही. चंडीगडजवळ हे गाव आहे. इथे कोणीही दुमजली घर बांधण्याचा प्रयत्न केला की नुकसान होते, अशी या येथील नागरिकांची भावना आहे.

प्राचीन काळी बाबरच्या राजवटीत एक हिंदू राजपूत हथनौरचा राजा होता. त्याच्या एका भावाचे लग्न हिमाचलमधल्या कांगडा इथल्या राजाच्या मुलीशी झाले होते. कांगडाची राजकुमारी माता जयंतीदेवीची मोठी भक्त होती.

देवीची पूजा करून आणि दर्शन घेतल्यानंतरच ती दररोज आहार घ्यायची. त्याचा येथे संदर्भ आहे. आतापर्यंत याच घराण्यातल्या पुजारी माता जयंतीची पूजा करत आहेत. देवीच्या वर कोणीही जाऊ शकत नाही, असे तिचे म्हणणे आहे आणि याचमुळे या गावात एकही दुमजली घर आढळून येत नाही.

Back to top button