दहा लाख वर्षांपूर्वी माणूस होता लुप्त होण्याच्या मार्गावर | पुढारी

दहा लाख वर्षांपूर्वी माणूस होता लुप्त होण्याच्या मार्गावर

वॉशिंग्टन : सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी माणूस लुप्त होण्याच्या मार्गावर होता. तब्बल एक लाख वर्षे पृथ्वीवरील माणसांची संख्या केवळ 1300 च्या आसपास राहिली होती, असे आता एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे. लुप्त होण्याच्या या धोक्यानेच आधुनिक माणूस तसेच त्याचे जवळचे नातेवाईक असलेले निएंडरथल व डेनिसोवनसारख्या अन्य मनुष्यप्रजातींच्या विकासात नवी भूमिका बजावली, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

जुन्या संशोधनांमधून असे दिसून आले आहे की आफ्रिकेत तीन लाख वर्षांपूर्वी आधुनिक माणसाचा विकास झाला. त्या काळातील अतिशय मोजके जीवाश्म उपल्ध आहेत. मात्र त्यावरून आधुनिक माणसाच्या विकासापूर्वी मानववंशाची कशी उत्पत्ती झाली याबाबतची निश्चित माहिती मिळत नाही. आता संशोधकांनी आधुनिक माणसाच्या विकासाच्या काळाबाबत नवे अध्ययन केले आहे. त्यांनी दहा आफ्रिकन लोकसंख्येतील तसेच 40 गैर-आफ्रिकन लोकसंख्येतील सध्याच्या 3150 आधुनिक माणसांमधील जीनोमचा अभ्यास केला.

वंशजांमधील जेनेटिक सिक्वेन्सिसमध्ये दिसणार्‍या वैविध्याच्या आधारे पूर्वजांच्या समूहाची रचना करण्यासाठी त्यांनी एक नवी विश्लेषणात्मक साधन विकसित केले. जेनेटिक डाटाने असे दर्शवले की 8,13,000 ते 93000 वर्षांपूर्वीच्या काळात आधुनिक माणसाचे पूर्वज गंभीररीत्या आकुंचित समुहाचे बनले होते. त्यांनी सुमारे 98.7 टक्के प्रजननक्षम लोकसंख्या गमावली होती. न्यूयॉर्क सिटीतील माऊंट सिनाईच्या इकाहन स्कील ऑफ मडिसिनचे वांगजी हू यांनी याबाबतची माहिती दिली. अतिशय दीर्घकाळापर्यंत आपल्या पूर्वजांनी अतिशय कमी लोकसंख्येच्या संकटाचा सामना केला होता, असे त्यांनी सांगितले.

Back to top button