खंडांच्या विभाजनामुळे वर आला हिर्‍यांचा ‘फवारा’! | पुढारी

खंडांच्या विभाजनामुळे वर आला हिर्‍यांचा ‘फवारा’!

लंडन : प्राचीन काळातील महाखंडांच्या विभाजनाने पृथ्वीच्या पोटातील हिर्‍यांचा फवारा वर उसळून येण्याला चालना दिली असावी, असे संशोधकांनी म्हटले आहे. हिर्‍यांची निर्मिती ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 150 किलोमीटर खोलीवर असलेल्या क्रस्टमध्ये होत असते. ‘किम्बर्लीटस्’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या उद्रेकामुळे हे हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत वर आले.

हे किम्बर्लीटस् ताशी 18 ते 133 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करतात. तसेच काही उद्रेक हे माऊंट व्हेसुवियस सारखे वायू व धुळीचे स्फोटही घडवून आणतात. इंग्लंडच्या साऊथम्प्टन युनिव्हर्सिटीतील संशोधक थॉमस गेर्नोन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ज्यावेळी टेक्टोनिक प्लेटस् या मोठ्या मार्गाने स्वतःला पुनर्रचित करतात त्यावेळी सहसा अशा किम्बर्लीटीज घडत असतात. प्राचीन काळातील ‘पँजिया’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या महाखंडाच्या विभाजनावेळीही अशी घटना घडली असावी. लाखो, अब्जावधी वर्षांपासून असे हिरे खंडांच्या तळाशी राहिलेले असतात. ते अशा घटनांमुळे शक्तिशाली उद्रेक होऊन जमिनीपर्यंत वर येतात.

Back to top button