Salivary glands : माणसाचे शरीरही बनवू शकते विष? | पुढारी

Salivary glands : माणसाचे शरीरही बनवू शकते विष?

टोकियो : जपानी वैज्ञानिकांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की माणसाच्या शरीरातही अशा लाळ ग्रंथी (Salivary glands) असतात ज्या विष बनवू शकतात. जगातील सर्वात विषारी सर्पांमध्येही अशाच प्रकारच्या लाळग्रंथी असतात. मात्र, माणसांमध्ये फ्लॅक्सिबल जीन्समुळे बिनविषारी प्राण्यांसारख्याच लाळग्रंथी विकसित झाल्या आहेत.

जर माणसाच्या लाळग्रंथी (Salivary glands) विषारी प्राण्याप्रमाणेच विकसित झाल्या तर त्या सहजपणे विषही बनवू शकतात. मानवी शरीरात अनेक प्रकारचे विषारी घटक बनत असतात आणि त्यांना अनेक मार्गाने शरीराबाहेर टाकलेही जात असते. मात्र, विषाची गरज नसल्याने माणसाच्या लाळग्रंथी त्याप्रमाणेच विकसित झाल्या.

माणूस आणि विषारी प्राण्यांच्या लाळग्रंथींमध्ये (Salivary glands) केवळ एका खास प्रोटिनच्या म्युटेशनचेच अंतर असते. मानवी शरीरात त्याच्या लाळेतून बाहेर पडणारे प्रोटिन कॅलिक्रेन्स म्युटेट होत नाही. विषारी प्राण्यांमध्ये ते म्युटेट होत असते. शरीरात घातक विष बनवण्यासाठी हे प्रोटिन म्युटेट म्हणजेच रुपांतरीत होणे गरजेचे असते. हे प्रोटिनच विष बनवण्याची सर्व यंत्रणा विकसित करीत असते. मात्र, तसे मानवी शरीरात घडत नाही.

Back to top button