आता ‘आयव्हीएफ ट्रिटमेंट’मध्येही मदत करणार ‘एआय’ | पुढारी

आता ‘आयव्हीएफ ट्रिटमेंट’मध्येही मदत करणार ‘एआय’

लंडन ः लवकर आई बनण्यासाठीही आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करणार आहे. इस्रायलच्या एका कंपनीने एक असे ‘एआय’ सॉफ्टवेअर बनवले आहे जे ‘आयव्हीएफ ट्रिटमेंट’वेळी सर्वात आशाजनक किंवा चांगल्या भ्रूणाचा छडा लावू शकेल. त्यामुळे ‘आयव्हीएफ ट्रिटमेंट’ यशस्वी होण्याची शक्यता 30 टक्के वाढेल. सोप्या शब्दात सांगायचे तर ‘एआय’च्या मदतीने गर्भधारणेची शक्यता यामुळे वाढू शकेल.

‘आयव्हीएफ ट्रिटमेंट’मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरच्या मदतीने जन्मलेल्या मुलांना ‘एआय बेबीज’ असे म्हटले जाईल. हे सॉफ्टवेअर ‘आयव्हीएफ प्रोसेस’वेळी अनुवंशिक असामान्यता (जेनेटिक एब्नॉर्मेलिटिज) शी संबंधित भ्रूणसंबंधी वैशिष्ट्यांचा छडा लावून सर्वात आशाजनक भ्रूणाची ओळख करील. ‘आयव्हीएफ’ म्हणजेच ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ हा गर्भधारणा करण्याची एक कृत्रिम पद्धत आहे. या पद्धतीत महिलेचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे प्रयोगशाळेत मीलन घडवले जाते. त्यानंतर विकसित झालेले भ्रूण महिलेच्या गर्भात स्थापित केले जाते. सॉफ्टवेयर बनवणारी रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी कंपनी ‘एआयव्हीएफ’चे सहसंस्थापक आणि सीईओ डॉ. गिल्बोआ यांनी सांगितले, आयव्हीएफ प्रोसेसदरम्यान एम्बि—यो म्हणजेच भ्रूणाची निवड करणे हे सर्वात कठीण आणि महत्त्वाचे काम असते. ‘एआय’ सॉफ्टवेअरला भ्रूणासंबंधी अशा वैशिष्ट्यांचा छडा लावण्याचे ‘प्रशिक्षण’ दिलेले आहे जे अनुवांशिक असामान्यता किंवा विकृती तसेच प्रत्यारोपणाशी संबंधित आहेत.

ते सर्वसामान्यपणे कोणत्याही तंत्राने सहजपणे समजू शकत नाही. ट्रेनिंगवेळी ‘एआय सॉफ्टवेअर’ला भ्रूणाच्या विकासाशी निगडीत अनेक तासांचे फुटेज दाखण्यात आले आहेत. त्यामुळे ‘एआय सॉफ्टवेअर’ला सर्वात आशाजनक व योग्य वाढ होण्यासारखा निकोप भ्रूण  कोणता आहे हे समजण्यास मदत मिळेल. डॉ. गिल्बोआ यांनी सांगितले की आतापर्यंत डॉक्टर एंबि—यो सिलेक्शन करीत आले आहेत. मात्र, अनेक वेळा सिलेक्शन चुकीचे होते आणि आयव्हीएफ ट्रिटमेंट अपयशी ठरते. त्यामुळे आता यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरची मदत घेतली जात आहे. सध्या महिलांना तीन ते पाचवेळा आयव्हीएफ ट्रिटमेंट घ्यावी लागते. मात्र, नव्या सॉफ्टवेअरमुळे केवळ एकदाच ‘आयव्हीएफ’ ट्रिटमेंट घ्यावी लागेल आणि त्यापासून पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल!

Back to top button