माद्रिद : स्पेनमध्ये राहत असलेल्या मारिया ब्रानयास मोरेरा या 115 वर्षे वयाच्या अमेरिकन महिलेस आता 'जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती' (115-year-old woman reveals secret) बनण्याचा किताब मिळाला आहे. याबाबत त्यांच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे. फ्रान्समधील 118 वर्षांच्या लूसिल या महिलेचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्यानंतर आता हा किताब मारिया यांना मिळाला आहे.
याबाबतची माहिती गिनिज बुकच्या अधिकृत ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटस्वरही देण्यात आली आहे. मारिया यांचा जन्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को शहरात 4 मार्च 1907 मध्ये झाला. सध्या त्यांचे वय 115 वर्षे, (115-year-old woman reveals secret) दहा महिने आणि 16 दिवस इतके आहे. मारियांची प्रकृती या वयातही चांग ली असून त्या आपण जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्याने आनंदित आहेत. त्यांना हा किताब मिळाल्याने आता त्यांच्या कुटुंबीयांनी मेजवानीचेही आयोजन केले आहे.
शिस्तबद्धता, शांती, कुटुंब व मित्र-मैत्रिणींशी चांगले संबंध, निसर्गाचा सहवास, भावनात्मक स्थिरता, चिंतेच्या आहारी न जाणे, पश्चात्तापाची भावना न बाळगणे, नकारात्मक लोकांपासून दूर राहणे आणि नेहमी सकारात्मक विचार करणे हेच आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे मारिया यांनी म्हटले आहे. शिवाय आपल्याला अनुवंशाने मिळालेली चांगली जनुके तसेच नशिबाची साथ यामुळेही इतके (115-year-old woman reveals secret) दीर्घायुष्य आपल्याला लाभले असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :