पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक महामारी कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. याचे पडसाद मानवी जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष झालेले आपण पाहत आहोत. लोकसंख्येच्या बाबतीत एक नंबरवर असलेल्या चीनमधील 80% लोकसंख्या कोरोनाने संक्रमित झाली आहे. येत्या दोन-तीन महिन्यात चीनला कोविड-19 च्या लाटेचा सामना करण्याची शक्यता कमी आहे. कारण 80 टक्के लोकांना आधीच या विषाणूची लागण झाली आहे. वाचा सविस्तर बातमी.(Corona outbreak)
माहितीनुसार पुढील दोन किंवा तीन महिन्यांत चीनमध्ये कोविड -19 ची मोठी लाट येण्याची शक्यता कमी आहे. असं चीनमधील एका सरकारी शास्त्रज्ञाने शनिवारी (दि.२१) सांगितले. कारण चीनमधील 80 टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन तज्ज्ञ वू झुन्यू यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, २१ जानेवारी पासून सुरू असलेल्या नववर्षाच्या सुट्टीच्या कालावधीत लोकांच्या मोठ्या संख्येने सामुहिक हालचालीमुळे साथीच्या रोगाचा प्रसार होऊ शकतो, काही भागात संसर्ग वाढू शकतो, परंतु येत्या काळात दुसरी कोविड लाट येण्याची शक्यता नाही.
लाखो चिनी लोक सुट्टीमुळे देशभरात प्रवास करत आहेत. हे लोक अलीकडेच सुलभ झालेल्या कोविड प्रतिबंधांखाली निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने वाढत चाललेल्या कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी कमी सुसज्ज असलेल्या ग्रामीण भागात नवीन उद्रेक येण्याचीही भीती निर्माण झाली आहे.
वैज्ञानिक वू ज्यून्यौै यांनी सांगितले आहे की, नववर्षानिमीत्त चीनमधील बऱ्याच शहरांमधील लोक आपल्या नातेवाईकांच्या किंवा जे नोकरीनिमित्त शहरात वास्तव्यास आहेत ते ग्रामीण भागात जात आहेत. त्यामुळे येथे कोरोना संक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे. कारण तेथे कोरोना प्रतिबंध व्यवस्था कमी आहे.
चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार 12 जानेवारीपर्यंत तब्बल ६० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर चीनने झिरो कोविड धोरण मागे घेतल्यामुळे कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगितले होते. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी (दि.२०) सांगितले की, चीनने कोविड रूग्णांच्या तापाचे दवाखाने, आपत्कालीन कक्ष पूर्णपणे भरले आहेत.
हेही वाचा