Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल | पुढारी

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञान इसमाने आझमी यांना फोनवरून धमकी दिली आहे. यावेळी अज्ञाताने आझमी यांना शिवीगाळही दिली. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी अबू आझमी यांनी औरंगजेबला पाठिंबा दिला होता. यावरून आझमी यांना फोनवरून शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी भादंवि कलम 506 (2) आणि 504 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

Back to top button