लंडन : काही लोकांना कुठेही मूत्रविसर्जन करण्याची सवय असते. अर्थात हा प्रकार आपल्याच देशात घडतो असे नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही अशी माणसं असू शकतात. अगदी लंडनमधील नागरिकही अशा लोकांमुळे त्रस्त झालेले आहेत. आता तेथील प्रशासनानेच यावर एक नामी उपाय शोधला आहे. तिथे घराच्या भिंतींना बाहेरील बाजूस असा रंग लावला जात आहे जो कुठेही मूत्रविसर्जन करणार्या लोकांना अद्दल घडवू शकतो. अशा भिंतीवर मूत्रविसर्जन केल्यास हे मूत्र बुमरँगसारखे (P repellent paint) उलटून संबंधित माणसाच्याच अंगावर येऊ शकते!
सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करणार्यांना अद्दल घडवण्यासाठी हा उपक्रम तिथे हाती घेण्यात आला आहे. तिथे हे 'पी रिपेलंट पेंट'(P repellent paint) भिंतीवर लावले जात आहे. हा एक असा पेंट आहे ज्यावर पाणी किंवा अन्य द्रवपदार्थ अजिबात टिकत नाही. इतकेच नव्हे त्यावर पाणी फेकले की ते 'बाऊन्स' होऊन परत येते. त्यामुळे जर अशा भिंतीवर लघुशंका करण्याची कुणी हिंमत केली तर हे मूत्र पुन्हा त्या माणसाच्याच अंगावर येईल! असा अँटी-पी पेंट अनेक घरांच्या भिंतीवर लावण्यात आला आहे.
वेस्टमिंस्टर सिटी कौन्सिलने लंडनच्या सोहो परिसरातील सुमारे 3 हजार नागरिक तसेच दुकानदारांच्या तक्रारीनंतर हा उपक्रम सुरू केला आहे. हा पेंट म्हणजे एक सुपरहायड्रोफोबिक लिक्विड आहे. पूर्णपणे पारदर्शक असलेल्या या रंगावर पाण्याचा एक थेंबही राहत नाही. हा पेंट एक वॉटर रेपेलंट (P repellent paint) लेयर बनवतो ज्यामुळे मूत्र त्यावरून उलटून संबंधित माणसालाच ओले करते! फुटपाथ आणि भिंतींना मूत्राच्या घाणीपासून स्वच्छ करण्यासाठी जितका खर्च येतो त्यापेक्षा हा पेंट अधिक स्वस्त आहे. हा पेंट वर्षातून किमान एकदा लावावा लागतो.
हेही वाचा :