पुढारी ऑनलाईन : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. ट्विटर युजर्सना जर ट्विटरवर जाहिरात नको असल्यास त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच जाहिरातमुक्त ट्विटर हे अधिक महाग होणार असल्याचे एलन मस्क याने म्हटले आहे.
ऑक्टोंबरमध्ये एलन मस्क यांनी ट्विट ताब्यात घेतले. ट्विटरचा ताबा घेताच एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. याचे संकेत त्यांनी पूर्वीच दिले होते. यानंतर ट्विटर या सोशल मिडिया नेटवर्कला मोठ्या आर्थिक अनिश्चततेचा सामना करावा लागला आहे. अनेक बदलानंतर मस्क यांनी जाहिरातीसंदर्भात ही मोठी घोषणा केली आहे.
मस्कने शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले यामध्ये त्याने म्हटले आहे की, ट्विटरवर जाहिराती खूप प्रमाणात आणि खूप मोठ्या आहेत. यावर पुढच्या आठवड्यापासून पावले उचलले जाणार असल्याचेही एलन मस्क यांनी स्पष्ट केले आहे. जे यूजर्स ट्विटरवरील जाहिरीती नाकारतील त्यांना अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.तर दुसऱ्या ट्विटमध्ये Twitter च्या बिझनेस मॉडेलमध्ये हा एक आमूलाग्र बदल असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे.
मस्क म्हणाले की महसूल वाढवताना मोठ्या प्रमाणात खर्च कमी करणे हे त्यांचे धोरण आहे आणि ट्विटर ब्लू नावाची नवीन सदस्यता सेवा, जी युजर्संना पैसे दिल्यानंतरच ब्लू व्हेरिफिकेशन टिक देते.युनायटेड स्टेट्समध्ये या सेवेची किंमत $11 प्रति महिना आहे आणि कंपनीच्या वेबसाइटवरील पृष्ठानुसार Apple च्या iOS आणि Google च्या Android मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध आहे. ट्विटर ब्लू ही सेवा सध्या युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये उपलब्ध आहे.