दोन शिंगांचा विषारी साप | पुढारी

दोन शिंगांचा विषारी साप

दुबई : संयुक्त अरब अमिरात हा वाळवंटीय आणि जगातील एक अत्यंत सुंदर देश आहे. यामुळेच जगभरातील पर्यटक या देशात गर्दी करत असतात. दिवस असू दे की रात्र, रोमांचाला या देशात कसलीच कमतरता नसते. असंख्य पर्यटक रात्रीच्या वेळी संयुक्त अरब अमिरातच्या वाळवंटात डेझर्ट कँपिंग करण्यासाठी येतात. दिवसा होरपळून टाकणारा पारा रात्रीच्या सुमारास पाच अंशांपर्यंत घसरतो.

यूएईचे वाळवंट अनेक जीवांच्या प्रजातींनी भरलेले आहे. यापैकी अत्यंत धोकादायक म्हणजे साप आणि विंचू होय. डे्रझर्ट कॅपिंग केलेल्या एक व्यक्तीने सांगितले की, रास अल खैमास आणि उम्म अल क्वॅन या भागात लोकांनी विविध प्रजातीच्या सापापासून सावधान राहण्याची गरज आहे. ते सुद्धा खासकरून हॉर्नड वाईपरपासून. या सापाच्या डोक्यावर दोन लहान शिंगे असतात. यास ‘सँड वाईपर’ असेही म्हटले जाते. हा साप अत्यंत वेगाने आपल्या दातातून दुसर्‍या जीवाच्या अथवा भक्ष्याच्या शरीरात विष सोडतो. अत्यंत चपळ सँड वाईपरच्या विषाने रक्ताच्या गुठळ्या होतात. अशा स्थितीत वेळीच उपचार केले नाही तर ते प्राणावरही बेतू शकते. हे साप प्रामुख्याने कमी पावसाच्या प्रदेशात आढळून येतात. यूएईमध्ये प्रामुख्याने अबू धाबी व रास अल खैमाहच्या उतरेस असलेल्या वाळवंटी भागात आढळून येतात.

या वाळवंटीय देशात सापाच्या 13 हून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत. सरपटणार्‍या जीवांपासून सावधान राहण्याचा इशारा यूएइमध्ये दिला जातो. प्रसंगी सापाचा दंश झाल्यास तातडीने वैद्यकिय उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र. शिंगे असलेल्या सँड वाईपरचा दंश झाल्यास वेळेवर उपचार केला तरच त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते.

Back to top button