सूर्यग्रहणाच्या दरम्यान लागले होते ‘हे’ तीन शोध | पुढारी

सूर्यग्रहणाच्या दरम्यान लागले होते ‘हे’ तीन शोध

नवी दिल्ली :  काही काही शोध हे अपघातानेच लागतात. चक्क सूर्यग्रहण होत असताना अपघातानेच तीन महत्त्वाचे शोध लागलेले आहेत. त्यांची ही माहिती..

हेलियम :  18 ऑगस्ट 1868 ची गोष्ट आहे. या दिवशी, सूर्यग्रहणाच्या वेळी पियरे जॅन्सेन आणि नॉर्मन लॉकियर यांनी पहिल्यांदा दुर्बिणीच्या सहाय्याने पिवळ्या रंगाची एक रेषा क्रोमोस्फियरमध्ये बघितली. सूर्याभोवती 400 कि.मी. ते 2100 कि.मी.च्या थराला ‘क्रोमोस्फियर’ असे म्हणतात. संशोधकांना नंतर कळले की या रेषेचे नाव हेलियम आहे. हेलियम हा फुग्यांमध्ये भरला जाणारा जगातील दुसरा सर्वात हलका घटक आहे. गंधहीन आणि बिनविषारी असल्यामुळे त्याला ‘नोबेल’ वायू असेही म्हणतात.

चंद्रापासूनचे अंतर ः खगोलशास्त्रज्ञ चौथ्या शतकापासून चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण 2150 वर्षांपूर्वी एका सूर्यग्रहणाच्या वेळी ग्रीक खगोलशास्त्रज्ञ हिप्पार्कसने आपल्या गणनेतून याची माहिती मिळवली होती. त्यांनी निरीक्षण केले की वायव्य तुर्कस्तानमध्ये चंद्राने सूर्याला पूर्णपणे झाकले आहे, तर इजिप्तमध्ये, 1000 कि.मी. अंतरावर, चंद्राने केवळ 80 टक्के सूर्य व्यापला आहे. साध्या त्रिकोणमितीचा वापर करून, हिप्पार्कसने पृथ्वीपासून चंद्राचे अंतर शोधले. यामुळेच आज आपल्याला माहीत आहे की पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,85,000 कि.मी. आहे.

चंद्राचे वातावरण ः 1605 मध्ये, जेव्हा खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केप्लर यांनी ग्रहणाच्या वेळी सूर्याभोवती तयार होणार्‍या तेजस्वी आभाबद्दल शोध लावला. तेव्हा त्यांनी शोधून काढले की चंद्रावर वातावरण नसल्यामुळे सूर्याची किरणे चंद्रावर आदळल्यानंतर परततात. येथूनच चंद्रावरील वातावरणाविषयी कळले.

Back to top button