आठवड्यातील सर्वात वाईट दिवस ‘सोमवार’! | पुढारी

आठवड्यातील सर्वात वाईट दिवस ‘सोमवार’!

लंडन ः शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा कामाच्या रहाटगाडग्यात स्वतःला अडकवून घेणे कुणालाच आवडत नाही. त्यामुळे सोमवारचा तिटकारा शाळकरी मुलांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वांनाच वाटतो. आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने अधिकृतपणेच ‘सोमवार हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस आहे’ असा किताब देऊन टाकला आहे! त्याची माहिती गिनिज बुकने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

या ट्विटनंतर सोशल मीडियात अनेक यूजर्सनी आनंद व्यक्त करून आपला पाठिंबाही जाहीर केला. अनेक मिम्स व जोक्सचाही पूर आला. एका यूजरने गिनिज बुक खरोखरच ‘स्मार्ट’ आहे अशी मल्लीनाथी केली. एकाने म्हटले की याच कारणामुळे मी सोमवारीच सुट्टी घेतो! एकाने तर सोमवारवर बंदी आणावी अशी अफलातून मागणीही केली. सोमवार उजाडला की अनेकांना आपले काम किंवा अध्यापन सुरू करण्याची इच्छा होत नाही. यामध्ये खरे तर सोमवारचा दोष नसून मानवी आळशीपणाचा, कामचुकारपणाचा व निरुत्साहीपणाचा दोष आहे. त्यामुळेच अनेक लोक व सेलिबि—टीजही ‘मंडे मोव्हेशन’साठी आपल्या फॉलोअर्सना जीवनातील ध्येयांकडे लक्ष ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन करीत असतात.

Back to top button