अनोखी 3 डी प्रिंट अंगठी लावणार डासांना पळवून | पुढारी

अनोखी 3 डी प्रिंट अंगठी लावणार डासांना पळवून

बर्लिन : अनेक आजारांचे कारण बनणार्‍या डासांना नष्ट करण्यासाठी आजपर्यंत अनेक पर्याय शोधण्यात आले आहेत. मात्र, डासांचे प्रमाण जराही कमी होताना दिसत नाही. डासांना पळवून लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता अनोखा पर्याय शोधून काढला आहे. जर्मनीमधील ‘मार्टिन लूथर युनिव्हर्सिटी’च्या शायस्त्रज्ञांनी एक नवी ‘3 डी प्रिंट’ अंगठी विकसित केली आहे. यामुळे डास व लहान लहान कीटकांना भरपूर वेळ दूर ठेवण्यास मदत मिळणार आहे.

डासांना पळवून लावणार्‍या या प्रकल्पावर दीर्घकाळापासून काम सुरू होते. युनिव्हर्सिटीचे प्रो. अँड्रोस्च यांनी सांगितले की, या ‘3 डी प्रिंट’ अंगठीच्या प्रोटोटाईपमध्ये आयआर-3535 या पदार्थाचा वापर करण्यात आला आहे. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्यूटिकल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनातील माहितीनुसार आयआर-3535 डासांविरोधी असलेला स्त्राव मानवी त्वचेला कोणतेच नुकसान पोहोचवत नाही. या अंगठीत ‘3 डी प्रिंटिंग’ तंत्रज्ञानाच्या मदतीने बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये डासविरोधी लिक्विड पोहोचविले.

या अनोख्या अंगठीमुळे लोकांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत मिळणार आहे. डासांना पळवून लावणार्‍या या अंगठीपूर्वी शास्त्रज्ञांनी बे्रसलेट तयार करण्याचा विचार केला होता. मानवी शरीराच्या तापमानाचा विचार केल्यास एकदा ही अंगठी घातली की, त्यातील लिक्विड संपण्यास सात दिवस लागतात. म्हणजेच, ही अंगठी एकदा घातली की, त्यापासून सात दिवस संरक्षण मिळणार आहे.

Back to top button