जर्मनीतील नदीत सापडले 400 वर्षांपूर्वीचे संरक्षित जहाज | पुढारी

जर्मनीतील नदीत सापडले 400 वर्षांपूर्वीचे संरक्षित जहाज

बर्लिन ः उत्तर जर्मनीतील जल पुरातत्त्वज्ञांनी तब्बल 400 वर्षांपूर्वीच्या जहाजाचे अवशेष शोधून काढले आहेत. हे एक मालवाहतूक करणारे जहाज होते. ते अद्यापही बर्‍याच अंशी सुस्थितीत असून त्यामध्ये लिंबू भरलेले बॅरल अजूनही पाहायला मिळत आहेत.

तेराव्या ते सतराव्या शतकाच्या काळात बाल्टिक आणि उत्तर समुद्रावर उत्तर युरोपियन व्यापारांच्या एका संघाचे वर्चस्व होते. याच काळातील हे मालवाहतूक करणारे जहाज असून त्याचा शोध लागणे ही एक दुर्मीळ घटना आहे. त्या काळातील जहाजांचे काही फुटकळ अवशेष यापूर्वीही सापडले आहेत; पण सुस्थितीत असणारे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. लुबेक शहराजवळच्या ट्रेव्ह नदीत हे जहाज बुडाले होते व नदीच्या गाळात अडकल्याने या चिखलाच्या थराखाली ते सुरक्षित राहू शकले. नदीत सुमारे 36 फूट खोलीवर हे जहाज सापडले. हे जहाज 66 ते 82 फूट लांबीचे होते.

Back to top button