पृथ्वीचा गाभा पूर्ण थंड झाला तर काय होईल? | पुढारी

पृथ्वीचा गाभा पूर्ण थंड झाला तर काय होईल?

नवी दिल्ली : खगोल शास्त्रज्ञांना संशोधनासाठी दुसर्‍या ग्रहांबरोबच पृथ्वीही अत्यंत उपयुक्‍त ठरते. पृथ्वीच्या अंतर्गत संरचेसंबंधी सातत्याने संशोधने होत असतात. मात्र, ती अद्यापही अपरीच म्हणावी लागतील. कारण, आतापर्यंत केलेल्या बहुतेक संशोधनांमध्ये पृथ्वीचा गाभा अत्यंत उष्ण आहे. मात्र, तो संथपणे थंड होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. असे असले तरी पृथ्वीचा गाभा पूर्णपणे कधी थंड होणार आणि तो थंड झाल्यानंतर पृथ्वीचे नेमके काय होणार? हे प्रश्‍न अनुत्तरितच आहेत.

वरील प्रश्‍नाचे उत्तर समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी पृथ्वीची तुलना मंगळाशी केली. मंगळाचा गाभा थंड झाला असला तरी पृथ्वीचा का झालेला नाही. मात्र, गाभा थंड झाल्यानेच मंगळाने वातावरण तसेच चुंबकीय क्षेत्र गमावले आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे. पृथ्वीचा गाभा सावकाशपणे थंड होत असला तरी त्याचा वेग अत्यंत कमी आहे. मात्र, एक ना एक दिवस तो थंड होणारच आहे. जर असे झाले तर पृथ्वीची स्थिती मंगळासारखीच होईल. शास्त्रज्ञांच्या मते, गाभा जेव्हा थंड होईल, तेव्हा पृथ्वीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. सर्वप्रथम पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र संपुष्टात येईल. कारण, वातावरण कायम राहण्यासाठी चुंबकीय क्षेत्र महत्त्वाचे ठरते. मात्र, तेच नष्ट झाल्यानंतर वातावरणही हळूहळू नष्ट होत जाईल. याशिवाय पृथ्वीवरील भूकंप आणि ज्वालामुखीही पूर्णपणे थांबतील.

Back to top button