85 फूट उंच खांबावर आजीबाईंचे नृत्य | पुढारी

85 फूट उंच खांबावर आजीबाईंचे नृत्य

लंडन : 

वयाच्या 81 व्या वर्षी माणूस काय करीत असेल असे तुम्हाला वाटते? या वयात शरीर थकलेले असल्याने कुणी फारशा हालचालीही करीत नसेल. मात्र, या वयातील एका आजीबाईंनी चक्‍क 85 फूट उंचीच्या खांबावर नृत्य करून दाखवले आहे! त्यांचा उत्साह, ऊर्जा व धैर्य यांचे आता कौतुक होत आहे.

कार्ला वलेंडा असे या आजीबाईंचे नाव आहे. वयाच्या 81 व्या वर्षी 85 फूट उंचीवरील त्यांच्या पोल डान्सला उपस्थितांनी दाद दिली. ‘फॉरेव्हर यंग’ या कार्यक्रमात त्यांनी ही करामत करून दाखवली व लोक थक्‍क झाले. त्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अनेक वृद्ध लोक आपापली कला व कौशल्ये दाखवत असतात. कार्ला यांनी सांगितले, मी यामधून लोकांचे मनोरंजन करते. धाडसी असले तरी मला हे करणे आवडते. मी वयाच्या तिसर्‍या वर्षापासून पोल डान्स करते!’

 

Back to top button