‘या’ भाजीची किंमत 80 हजार रुपये किलो! | पुढारी

‘या’ भाजीची किंमत 80 हजार रुपये किलो!

बर्लिन :

कधी कधी भाज्यांचे दरही गगनाला जाऊन भिडतात. मात्र, तरीही एखादी भाजी हजारो रुपयांना किलोभर मिळेल असे आपल्याला वाटणार नाही. एक भाजी मात्र अशी भलतीच महाग आहे. या भाजीचे नाव आहे ‘हॉप शूटस्’. या भाजीचा दर 1 हजार रुपये प्रतिकिलो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 80 हजार रुपये प्रतिकिलो इतका आहे!

या भाजीचे जे फूल असते त्याला ‘हॉप कोन्स’ असे म्हणतात. या फुलाचा वापर बियर बनवण्यासाठी केला जातो. अन्य शाखांचा वापर पालेभाजीसारखा होतो. अतिशय महाग असल्याने ती क्‍वचितच एखाद्या मॉलमध्ये किंवा बाजारात पाहायला मिळते. या भाजीत अनेक औषधी गुण असतात. अनेक शतकांपूर्वीच याची माहिती लोकांना मिळालेली होती. त्यामुळे तिचा वापर वनौषधीसारखाही केला जातो. विशेषतः दातांमधील वेदनेवर ही भाजी गुणकारी आहे. या भाजीत अँटिबायोटिक गुण असतात व क्षयासारख्या आजारामध्येही तिचे सेवन लाभदायक ठरते. पाश्‍चात्य लोक ‘हॉप शूटस्’ कच्चीही खातात. मात्र, तिची चव मेथीच्या भाजीपेक्षाही कडू असते. भाजीचे देठ सॅलडमध्ये वापरले जातात. त्यांचे लोणचेही बनवले जाते. इसवी सन 800 पासूनचा या भाजीच्या वापराचे उल्‍लेख मिळतात. उत्तर जर्मनीत या भाजीची शेती सर्वात आधी सुरू झाली.

Back to top button