ब्रह्मांड दिसते हुबेहूब मानवी डोळ्यासारखे | पुढारी

ब्रह्मांड दिसते हुबेहूब मानवी डोळ्यासारखे

वाशिंग्टन : ब्रह्मांड हे असंख्य रहस्यांनी भरलेले आहे. शास्त्रज्ञांनी याबद्दल कितीही माहिती मिळविली तरीही तोकडीच पडते, असे वाटते. अशा स्थितीत एखादी आश्‍चर्यचकीत करणारी घटना आणि दुर्मीळ छायाचित्रे पाहण्यास मिळाली तर? तर तुम्ही काय म्हणू शकाल. तुमच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडेल आणि तो म्हणजे अतिसुंदर हा होय. नासाने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये ब्रह्मांड हे हुबेहूब मानवी डोळ्यासारखे दिसत आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने आपल्या ब्रह्मांडाची काही आश्‍चर्यकारक आणि अत्यंत सुंदर छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये आकाशगंगा, सुपरनोव्हाचे काही अवशेष, तारे, ग्रह यांची आहेत. ‘नासा’ने ही छायाचित्रे शक्‍तिशाली दुर्बीण म्हणून  ओळखल्या जाणार्‍या चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीच्या मदतीने ने टिपली आहेत. 

चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी ही अवकाशीय दुर्बीण खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडातील सर्व घटकांची एक्स रे छायाचित्रे पाठवते. कॉस्मिक वर्ल्डमध्ये (ब्रह्मांडीय जग) एक्स रे तेव्हाच बनतात, जेव्हा कोणताही पदार्थ लाखो अंश सेल्सियसपर्यंत उष्ण होतो आणि त्याचे उत्सर्जन ब्लॅक होल्स, न्यूट्रॉन स्टार आणि सुपरनोव्हाच्या अवशेषात होते. चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीला 23 जुलै 1999 रोजी अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले होते. याच ऑब्झर्व्हेेटरीकडून मिळालेली छायाचित्रे नुकतीच ‘नासा’ने प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये ब्रह्मांड हे हुबेहूब माणसाच्या डोळ्यासारखे दिसत आहे. 

Back to top button