जामियाच्या प्राध्यापकाने बनवले नॅनो सिमेंट | पुढारी | पुढारी

जामियाच्या प्राध्यापकाने बनवले नॅनो सिमेंट | पुढारी

नवी दिल्‍ली : जामिया मिल्‍लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या एका सहायक प्राध्यापकाने नॅनो सिंमेट विकसित केले आहे. या शोधाला भारत सरकारकडून पेटंटही देण्यात आले आहे. इबादूर रहमान नावाचे हे प्राध्यापक जामियाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात आहेत. 

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात बी.टेक. करीत असताना तसेच ‘डीटीयू’मध्ये एम.टेक. करीत असतानाच त्यांच्या मनात असे नॅनो सिमेंट तयार करण्याची संकल्पना घोळत होती. त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूर आणि जामियाच्या प्रयोगशाळेत याबाबतचे प्रयोग केले. या शोधाला त्यांनी ‘हाय स्ट्रेंथ सीमेंटिटियम नॅनोकंपोझिट कंपोझिशन अँड मेथड मेकिंग द सेम’ असे नाव दिले आहे. या शोधाचा उद्देश नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सिमेंटचे उत्पादन करून मोठ्या इमारती व पूल बांधण्यासाठीच्या साहित्याचे वजन कमी करणे हे आहे. सध्या ते नॅनो काँक्रिटवर काम करीत आहेत. नॅनो सिंमेट विकसित करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. 2012 मध्ये त्यांनी हे प्रयोग करणे सुरू केले व 2014 मध्ये त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्याचे पेटंट मिळावे यासाठी अर्ज करण्यात आला. 14 सप्टेंबरला त्यांना याबाबतचे पेटंटही मिळाले आहे.

Back to top button