बिबट्या की मांजर? हे आहे लेपर्ड कॅट ! | पुढारी

बिबट्या की मांजर? हे आहे लेपर्ड कॅट !

भुवनेश्वर ः जगभरात अनेक अनोखे प्राणी पाहायला मिळतात. असे विचित्र प्राणी पाहून लोकांना आश्चर्य वाटत असते. आता भारतात ओडिशामध्ये असाच एक विचित्र प्राणी दिसला आहे. या प्राण्याचे नाव आहे ‘लेपर्ड कॅट’. मांजरासारखाच पण अंगावर बिबट्यासारखे ठिपके असलेला हा प्राणी आहे. ओडिशामधील जंगलात टिपलेला त्याचा फोटो आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या प्राण्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. हा फोटो पाहून अनेक यूजर बुचकळ्यात पडले. बिबट्या आहे की मांजर असा प्रश्न त्यांना पडला. सुशांत नंदा यांनी आधी ‘हा प्राणी कोणता आहे हे ओळखा’ असे ट्विट केले होते. त्याचे उत्तर कुणी देऊ शकले नसल्याने त्यांनीच पुन्हा ट्विट करून या प्राण्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या प्राण्याचे नाव ‘लेपर्ड कॅट’ असे आहे. भारतात त्यालाही कायद्याने संरक्षण आहे. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील जंगलात हे लेपर्ड कॅट कॅमेर्‍यात कैद झाले. या भागात अशा मांजरांची संख्या अधिक आहे आणि ती स्थिरही आहे.

Back to top button