सूर्यमालेबाहेरील पाच हजार ग्रहांचा शोध | पुढारी

सूर्यमालेबाहेरील पाच हजार ग्रहांचा शोध

वॉशिंग्टन : पृथ्वीशिवाय ब्रह्मांडात आणखी कोठे जीवन आहे, हा प्रश्न कायम चर्चेत असतो. या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच एलियन्सबाबतही आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतो. एलियन्स असतील तर ते नेमक्या कोणत्या ग्रहावर असतील. अमेरिकन संशोधन संस्था ‘नासा’च्या मते, या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा आले आहे.

‘नासा’ने पुष्टी केली आहे की, आपल्या सूर्यमालेशिवाय अंतराळात असे पाच हजार ग्रह शोधण्यात आले आहेत. यापैकी गेल्या काही काळात 65 नवे ग्रह शोधण्यात आले आहेत. या बाह्यग्रहांमध्ये पृथ्वीसारखे सुमारे 200 ग्रह आहेत. यामध्ये के-2-377 बी या बाह्यग्रहाचाही समावेश आहे. ज्याला सुपर अर्थ असेही म्हटले जाते. हा ग्रह आपल्या तार्‍याभोवती 12.8 दिवसांत एक फेरा पूर्ण करतो. अशा ग्रहांना ‘नासा’ने एक्सोप्लॅनेट आर्काइव्हमध्ये ठेवले आहे. यासंदर्भात संशोधक ख्रिश्चियन सॅन यांनी सांगितले की, प्रत्येक बाह्यग्रह म्हणजे एक जगच आहे. हे बाह्यग्रह आपल्या सूर्यमालेबाहेर आहेत. ते आपल्या तार्‍याभोवती फिरत असतात.

‘नासा’ने 1990 च्या दशकात सुमारे तीन हजार बाह्यग्रहांचा शोध लावला होता. ‘नासा’ने या ग्रहांचा शोध ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटच्या मदतीने लावला आहे. हे सर्व ग्रह आपल्या आकाशगंगेच्या बाहेरचे आहेत.

आतापर्यंत शोधण्यात आलेल्या बाह्यग्रहांपैकी 30 टक्के बाह्यग्रह गॅस ग्लेटस्, 31 टक्के सुपर अर्थ आणि 35 टक्के नेपच्यूनसारखे आहेत. केवळ चार टक्के बाह्यग्रह पृथ्वी अथवा मंगळासारखे आहेत. या बाह्यग्रहांचे अवलोकन करून ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली आहे, याचा शोध लावण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.

Back to top button