बटाट्यांच्या टंचाईने जगभर फ्रेंच फ्राईज, चिप्स संकटात! | पुढारी

बटाट्यांच्या टंचाईने जगभर फ्रेंच फ्राईज, चिप्स संकटात!

फ्रेंच फ्राईजसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक साखळी रेस्टॉरंटस्नी सध्या फ्राईज देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. जपानमध्ये गेल्या महिन्यापासून फ्राईजवर संक्रात आली आहे. ग्राहकांना बटाटे येईपर्यंत वाट पाहण्याची विनंती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत बटाट्याच्या चिप्सना मोठीच मागणी असते.

मात्र, पुढील काही दिवसांमध्ये बटाट्यांचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर चिप्सचे उत्पादन बंद होईल असा इशारा चिप्स उत्पादकांनी दिला आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेत जोरदार पाऊस आणि पूर यामुळे बटाट्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आयात केलेला बटाटाही अडकून पडला आहे. केनियात प्रत्येक डीशसोबत बटाटा चिप्स खाण्याची नागरिकांना सवय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिप्स देणे रेस्टॉरंटस्नी बंद केले आहे.

  • तुमचा औषधाविना मधुमेह नियंत्रणात येतो | डॉ. जगन्नाथ दीक्षित

Back to top button