औरंगाबाद : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने

औरंगाबाद : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : वाढती महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी याच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्याचे सहप्रभारी अॅड. मुजाहेद खान, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोदी तेरे शासन मे आग लगी है राशन मे… कहा गये कहा गये अच्छे दिन कहा गये…, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नाही चलेगी…, सगळीकडे सुरू आहे, नुसता भोंगळ कारभार…, जबाबदार आहे त्याला फक्त मोदी सरकार…, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news