Richa Chadha-Ali Fazal Weddings : रिचा चढ्ढा-अली फजलचे लग्न सप्टेंबरमध्ये! | पुढारी

Richa Chadha-Ali Fazal Weddings : रिचा चढ्ढा-अली फजलचे लग्न सप्टेंबरमध्ये!

पुढारी ऑनलाईन डेस्क : लवकरच बॉलिवूडमध्ये एका कपलच्या घरी लग्नाचे ढोल वाजायला सुरुवात होणार आहे. चित्रपट इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचे लग्न सप्टेंबरमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Richa Chadha-Ali Fazal Weddings) ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपे सप्टेंबर २०२२ मध्ये लग्न करणार आहेत. वेडिंग फंक्शन्सदेखील निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Richa Chadha-Ali Fazal Weddings)

ऋचा चढ्ढा आणि अली फजल २०१२ मध्ये ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सात वर्षे डेटिंग केल्यानंतर अलीने २०१९ मध्ये ऋचाला प्रपोज केले. डेटिंगनंतर हे जोडपे २०२० मध्ये लग्न करणार होते. पण कोरोनामुळे लग्न पुढे ढकलले. नंतर हे जोडपे मार्च २०२२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार होते. पण काही कारणास्तव ते पुढे ढकलले6 गेले. आता ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की रिचा आणि अली सप्टेंबरच्या अखेरीस लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, दोन लग्न समारंभ होतील, एक मुंबईत आणि दुसरा देशाची राजधानी दिल्लीत. रिचा चढ्ढा लग्नाची जोरदार तयारी करत आहे.

रिचाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा ती म्हणाली होती, “जेव्हा जेव्हा आपण लग्न करण्याचा विचार करतो तेव्हा एक नवीन कोविड -१९ प्रकार येतो. २०२० मध्ये, आम्ही यासाठी जागादेखील बुक केली होती. परंतु पहिली लाट आली, त्यानंतर लॉकडाऊन लागला. दुसऱ्या लाटेचा अनुभव भारतात सर्वात वाईट होता. जे आम्हाला नंतर भेटले, त्यांचीही लग्ने झाली. आम्हाला यावर्षी लग्न करायचे आहे.

Back to top button