औरंगाबाद : गोळेगावात कापसाने भरलेला ट्रक चोरीला | पुढारी

औरंगाबाद : गोळेगावात कापसाने भरलेला ट्रक चोरीला

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा कापसाने भरुन उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना आज (रविवार) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या टेम्‍पोचा शोध सुरू आहे. राजेद्र तुकाराम दौड (रा. पानवडोद ता. सिल्लोड) यांचा हा आयशर ट्रक आहे. ते या गाडीव्दारे कापूस वाहतूक करतात.

दरम्यान, ट्रक चालकाने ट्रक मध्ये कापूस भरून हा ट्रक गोळेगावाजवळ असलेल्या आदित्य पेट्रोलपंप परिसरात काल (शनिवार) रात्री उभा केला होता. आज (रविवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालक ट्रक लावलेल्‍या जागी गेला असता, त्यांना ट्रक त्‍या ठिकाणी आढळला नाही.

दरम्यान, रात्री कोणीतरी ट्रक तिथून चोरल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्याने ट्रक मालकाला या विषयी सांगितले. सदर ट्रक औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील गोळेगाव येथील आदित्य पेट्रोल पंपावर उभा होता. पोलिसांनी या ट्रकचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button