जालन्यात दोन दुकानांना भीषण आग; 18 लाखाचे सामान जळून खाक | पुढारी

जालन्यात दोन दुकानांना भीषण आग; 18 लाखाचे सामान जळून खाक

जालना; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवीन जालना भागातील कडबी मंडी परिसरातील विनोद एका गोडाऊन व मेडिकलला बुधवारी (दि. १५) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, अग्निशामक दलास सहा तासानंतर सकाळी ६:३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

बुधवारी मध्यरात्री २:३० च्या सुमारास नवीन जालना भागातील विनोद किराणा दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. दरम्यान, रात्रीची वेळ असल्याने ती आग पसरली, शेजारीच असलेल्या राठी मेडिकलला देखील भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी दुकान मालकास तात्काळ माहिती दिली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधीकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तास अथक परिश्रम करत सकाळी साडे सहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

यावेळी अग्निशमन दलाचे शेख रशीद, संदीप दराडे, पंजाबराव देशमुख, नागेश घुगे, सादिक अली, जॉन गवळे, किशोर सकट यांनी परिश्रम घेतले. किराणा दुकानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊन मधील तुपाचे डबे, साबण, बिस्कीट, सोडा, मसालेचे बॉक्स, मुरमुरे थैले, अगरबत्ती यासह किरणामालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहीती गोडाऊन मालकांनी दिली आहे. तसेच मेडिकलचा पाठीमागील पूर्ण भाग जळून खाक झाला आहे. यात मेडिकल मधील गोळ्या, औषधी व फ्रीज जळाले आहे. सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मेडिकल चालकाने दिली तर किराणा दुकानाचे अंदाजे 8 लाखाचे नुकसाण झाले असल्याची प्राथमिक माहीती दुकान मालकांनी दिली.

हेही वाचा

Back to top button